iQOO Z9 वर डिस्काउंट
iQOO Z9 सध्या Flipkart वर 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 17,927 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे. दुसरीकडे, Amazonवर हा हँडसेट 18,499 रुपयांना विकत आहे. Amazon वर 500 रुपयांचे अतिरिक्त डिस्काउंट कूपन देखील उपलब्ध आहे. ज्यावर तुम्ही कमी किंमत पाहण्यासाठी चेकआउट पेजवर टिक करू शकता. स्टँडर्ड मॉडेलची लॉन्च किंमत 19,999 रुपये आहे, याचा अर्थ Flipkart आणि Amazon दोन्ही चांगल्या डिस्काउंट ऑफर देत आहेत.
advertisement
Fake Iphone identify Tips: खुलेआम विकले जाताय iPhone! तुमचा नकली आहे की असली? असं करा चेक
कूपन देखील वापरा
Amazon देखील 256GB स्टोरेज मॉडेलवर सूट देत आहे. जे तुम्ही साइटवर पाहू शकता. 256GB मॉडेल Amazon वर 20,499 रुपयांना लिस्ट केले गेले आहे. जे 21,999 रुपयांच्या लॉन्च किमतीपेक्षा कमी आहे. Amazon वर 1,000 रुपयांची एक्स्ट्रा कूपन डिस्काउंट देखील आहे. जी किंमत 19,499 रुपयांपर्यंत खाली आणेल. तसेच, लक्षात ठेवा की, चेकआउट पेजवर हे क्लेम करण्यासाठी तुम्ही प्रथम कूपन डिस्काउंट ऑफर निवडणे आवश्यक आहे.
iQOO Z9: फीचर्स
iQOO Z9 5G ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 चिपसेटसह येतो. हँडसेट लेटेस्ट Android 14 OS वर काम करतो. यात 6.67-इंचाचा FHD+ AMOLED 120Hz डिस्प्ले, 300Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 91.90 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. पॅनेलमध्ये DT-Star 2 Plus ग्लास प्रोटेक्शन देखील आहे.
WhatsApp वर फोटो सेंड केल्याने क्वालिटी खराब होते? HD मध्ये असे करा सेंड
कॅमेरा देखील जबरदस्त
फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी Sony IMX882 कॅमेरा आहे. यात 2-मेगापिक्सलचा सेन्सर देखील आहे. कॅमेरा ॲपमध्ये नाईट मोड, सुपरमून, प्रो, लाइव्ह फोटो आणि बरेच काही जसं की, फोटोग्राफी फीचर्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी, कंपनीने फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेन्सर समाविष्ट केला आहे.
44W फास्ट चार्जिंग सपोर्ट
iQOO Z9 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. स्मार्टफोनसोबत रिटेल बॉक्समध्ये तुम्हाला एक फास्ट चार्जर मिळेल. iQOO फोन IP54-रेट आहे, याचा अर्थ तो स्प्लॅश-रेसिस्टेंट आहे. यात ड्युअल स्टीरिओ स्पीकर देखील आहेत.