TRENDING:

Flipkart चा भारी सेल सुरु! आयफोनपासून सॅमसंगपर्यंत सर्वच फोन्सवर डिस्काउंट

Last Updated:

Flipkart Big Bachat Days Sale सुरू झाला आहे. या सेलदरम्यान अनेक डिस्काउंट, ऑफर आणि डील्स दिल्या जात आहेत. 5 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये यूझर्स सहजपणे चांगल्या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतात. येथे iPhone 15 सह अनेक हँडसेटवर सूट उपलब्ध आहे. याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच फ्लिपकार्टवर सेल सुरू झाला आहे. या सेलचे नाव आहे Flipkart Big Bachat Days Sale. हा सेल 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या सेलदरम्यान अनेक वस्तूंवर सूट मिळणार आहे. याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
फ्लिपकार्ट
फ्लिपकार्ट
advertisement

Flipkart Big Bachat Days Sale सह, अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट उपलब्ध आहेत. या सेलदरम्यान, Xiaomi Redmi, Samsung, Vivo आणि इतर अनेक ब्रँड्सच्या हँडसेटवर सूट मिळत आहे. येथे तुम्ही Nothing ब्रँडचे हँडसेट स्वस्तात खरेदी करू शकता.

कोणताच कॉल होणार नाही मिस, या सेटिंगने येईल मिस्ड कॉल्सचं रिमाइंडर

iPhoneवरही डील उपलब्ध आहेत

advertisement

Flipkart Big Bachat Days Sale दरम्यान iPhone 15 स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. येथे Apple iPhone 15 59,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, त्याची मूळ किंमत 70 हजार रुपये आहे. येथे iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 50,999 रुपये आहे.

iPhone 15 चे स्पेसिफिकेशन्स

Apple iPhone 15 च्या फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, यात 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. याचे 1179 x 2556 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यामध्ये Ceramic Shield ग्लास वापरण्यात आला आहे.

advertisement

Jio, Airtel चे हे जबरदस्त प्लॅन ; Amazon Prime फ्री, डेटाही भरपूर

Apple iPhone 15 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48MP आहे, तर दुसरा कॅमेरा 12MP आहे. यात 12MP सेल्फी कॅमेरा आहे. चार्जिंगसाठी USB Type-C 2.0 चा वापर करण्यात आला आहे.

Samsung हँडसेटवर सूट

फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल दरम्यान सॅमसंग हँडसेटवर सूट मिळत आहे. या सेल दरम्यान Samsung Galaxy S23 सीरीज, Samsung Galaxy F15 5G हँडसेट, Samsung Galaxy M35 5G फोन स्वस्तात खरेदी करता येतील. फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल दरम्यान स्मार्ट गॅझेटवर डिस्काउंट उपलब्ध आहेत. येथे स्मार्टवॉच, फिटनेस बँड, स्पीकर इत्यादींवर डिस्काउंट मिळतंय.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Flipkart चा भारी सेल सुरु! आयफोनपासून सॅमसंगपर्यंत सर्वच फोन्सवर डिस्काउंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल