TRENDING:

ट्रॅफिक चालानच्या नावावर होतंय मोठा स्कॅम! तुम्हीही करताय का ही चूक?

Last Updated:

वाहतूक चलनाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीबाबत सरकारने इशारा दिला आहे. MeitY ने लोकांना अशा बनावट मेसेज आणि ई-मेलपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सायबर फसवणुकीबाबत सरकारने नवीन स्कॅम अलर्ट जारी केला आहे. सध्या सायबर गुन्हेगार वाहतूक चलनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत. यामुळे लोकांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे आयटी मंत्रालयाने लोकांना इशारा दिला आहे. ई-चलन पेमेंट करण्यासाठी लोकांना बनावट लिंक पाठवली जाते, ज्यामुळे लोक फसतात आणि मोठी फसवणूक होते.
फ्रॉड अलर्ट
फ्रॉड अलर्ट
advertisement

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना बनावट ॲप्सचा मेसेज, ई-मेल किंवा नोटिफिकेशन पाठवलं जात असल्याचे सरकारने आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे. दिलेल्या मेसेजमध्ये लोकांना ई-चलानची थकबाकी भरण्यास सांगितले आहे. पाठवलेल्या मेसेजमध्ये एक बनावट लिंक आहे, ज्याद्वारे लोकांना चलन भरण्यास सांगितले जाते. काहीवेळा हॅकर्स लोकांना मेसेज किंवा ई-मेलमध्ये बनावट ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवतात. सायबर गुन्हेगारांच्या या जाळ्यात अनेकजण अडकतात आणि आपली कमाई गमावतात.

advertisement

असा साधतात निशाना

- बनावट संदेश पाठवून लोकांना घाबरवले जाते, ज्यामध्ये लोकांना सांगितले जाते की चालान न भरल्यास त्यांचे वाहन जप्त केले जाईल. लोक घाबरतात आणि कोणतीही पडताळणी न करता हॅकर्सच्या सापळ्यात अडकतात.

OnePlusचा सर्वात भारी स्मार्टफोन झाला लॉन्च! 24GB रॅमसह 100W ची चार्जिंग

-हॅकर्स लोकांना मेसेज किंवा ई-मेलद्वारे बनावट लिंक पाठवत आहेत. या लिंकवर क्लिक केल्यावर सरकारी वेबसाइटसारखीच एक वेबसाइट उघडते. यामुळे लोक सहज हॅकर्सच्या जाळ्यात येतात आणि त्यांची फसवणूक होते.

advertisement

-अनेक वेळा, बनावट फोन नंबर लोकांना मेसेजमध्ये पाठवले जातात. ज्यावर कॉल केल्यावर हॅकर्स कॉल कनेक्ट करतात. लोकांना अडकवण्यासाठी आणि त्यांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स सोशल इंजिनिअरिंगची मदत घेतात.

असे टाळा

घोटाळेबाजांच्या सापळ्यात पडण्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्ही मेसेज किंवा ई-मेलमध्ये मिळालेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. व्हेरिफिकेशनशिवाय कोणतीही माहिती शेअर करू नका.

advertisement

स्कॅमर्स आणि फ्रॉडस्टर्सवर येणार संकट! डिसेंबरपासून मिळणार नाही OTP

मेसेज किंवा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची पडताळणी करुन तुम्ही मेसेज आणि ई-मेल्सकडे दुर्लक्ष केले पाहिजे. जर तुम्ही चुकून कोणतीही लिंक उघडली असेल तर प्रथम दिलेल्या वेबसाइटची पडताळणी करा.

असे ई-चलन किंवा कोणतीही सरकारी सूचना अधिकृत ई-मेलवरून येते. अशा स्थितीत, आधी पाठवणाऱ्याचा ई-मेल आणि पाठवणाऱ्याचा नंबर व्हेरिफाय करा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

तुमची पर्सनल माहिती, बँक डिटेल्स इत्यादी कधीही कोणाशीही शेअर करू नका.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ट्रॅफिक चालानच्या नावावर होतंय मोठा स्कॅम! तुम्हीही करताय का ही चूक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल