हे नवं स्कॅम कसं काम करतं?
स्कॅमर्स खुप हुशारने हा स्कॅम करतात. तुम्ही नवा फोन खरेदी करताच तुम्हाला एक कॉल येतो. कॉल करणारा हा स्वतःला मोबाईल कंपनीचा किंवा बँक अधिकारी असल्याचे सांगतो. तो म्हणता की, तुमच्या फोनचे व्हेरिफिकेशन किंवा अॅक्टिव्हेशन करणं हे गरजेचं आहे. तुम्ही अस केलं नाही तर डिव्हाइस ब्लॉक होऊ शकतो.
advertisement
यानंतर तो बनावट अधिकारी तु्म्हाला फोनमध्ये एक अॅप डाउनलोड करण्यास सांगतो. तसंच एखादा कोड शेअर करायला लावतो. तुम्ही हे केल्यास, स्कॅमरला तुमच्या फोनचा अॅक्सेस मिळतो. अनेक प्रकरणांमध्ये फोन पूर्णपणे लॉक होतो. ज्यामुळे तुमच्या फोनमधील पूर्ण डेटा चोरीला जातो.
फोनमध्ये नेटवर्क येत नाही का? 90% लोकांना माहितीच नसतं खरं कारण, लगेच घ्या जाणून
नुकसान कसं होतं?
अशा प्रकारच्या स्कॅम्समध्ये अडकल्यामुळे फक्त तुमचा फोन नाही तर पर्सनल माहितीही धोक्यात येते. बँक डिटेल्स, पासवर्ड, फोटो आणि गरजेचे डॉक्यूमेंट्स स्कॅमर्सच्या हाती लागू शकतात. अनेकदा तुमच्या फोनचा वापर दुसऱ्यांची फसवणूक करण्यासाठीही केला जाऊ शकतो.
कॉल खरा आहे की बनावट, या संकेंतावरुनही कळेल
तुम्हाला अचानक एखादा कॉल आला आणि त्यांनी तुम्हाला लगेच ओटीपी विचारला किंवा अॅप डाउनलोड करण्यास सांगितलं. तर सावध व्हायला हवं. खऱ्या कंपन्या कधीच फोनवर अशी माहिती मागत नाहीत. घाईघाईत निर्णय घेण्याचा दबाव टाकणे ही स्कॅमर्सची चाल असते. ज्यामुळे तुम्ही यात अजिबात अडकू नका.
लॅपटॉप स्लो चालतोय? एक रुपयाही खर्च न करता चालेल सुपरफास्ट, करा ही सेटिंग
स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं?
- अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सावध राहा.
- कोणत्याही अनोळखी नंबरवर विश्वास ठेवू नका.
- विचार न करता कोणतंही अॅप इंस्टॉल करू नका.
- फोनमध्ये मजबूत पासवर्ड ठेवा.
- वेळोवेळी सॉफ्टवेयर अपडेट करत राहा.
- एखादा कॉल संशयास्पद वाटल्यास लगेच कट करा.
- गरज पडल्यास स्वतः संबंधित कंपनीशी संपर्क करा.
सुरक्षित कसं राहायचं?
नवीन टेक्नॉलॉजी आपलं आयुष्य सोपं बनवतेय. तसंच सायबर फसवणूक करणारेही नवनवीन पद्धती शोधत आहेत. यामुळे तुम्ही जागृक राहणं खुप गरजेचं आहे. कधीच अनोळखी कॉल किंवा मेसेजवर डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका. थोडं अलर्ट राहिलात तर तुमचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं.
