हे नवीन फीचर Geminiच्या 'Canvas' टूलवर आधारित आहे. जे आधीच कंटेंट क्रिएशनसाठी वापरले जात होते. आता, ते यूझर्सना कोणताही आयडिया, डॉक्यूमेंट किंवा रिपोर्ट काही सेकंदात प्रोफेशनल आणि व्हिज्युअल प्रेझेंटेशन रूपांतरित करण्यास अनुमती देते.
जेमिनीसह Google Slides प्रेझेंटेशन कसे तयार करावे
Gemini अॅपमध्ये (वेबवर उपलब्ध), यूझर्सना फक्त टूलबारमधून 'Canvas' ऑप्शन निवडावा लागेल आणि ‘Create a presentation’ असे म्हणावे लागेल. तुम्ही 'Roman Republicवर लेसन तयार करा' असा टॉपिक प्रविष्ट करू शकता किंवा फाइल अपलोड करू शकता—जसे की रिसर्च रिपोर्ट, नोट्स किंवा सेल्स ब्रीफ.
advertisement
YouTube क्रिएटर्सची कमाई होईल डबल! या AI फीचरने काम होईल सोपं
त्यानंतर Gemini आपोआप एक मल्टी-स्लाइड प्रेझेंटेशन तयार करते. ज्यामध्ये टायटल, हेडिंग्स, पॉइंट्स आणि संबंधित इमेजेजचा समावेश असतो. यूझर तयार केलेल्या स्लाइड्स थेट Google Slides वर निर्यात करू शकतात आणि तेथे त्या एडिट किंवा कस्टमाइज करू शकतात.
हे फीचर कोण वापरू शकते?
गुगलच्या मते, हे नवीन जेमिनी Gemini Slides विविध प्रकारच्या यूझर्ससाठी फायदेशीर ठरेल:
प्रोफेशनल्स: त्यांचे बिझनेस डॉक्यूमेंट किंवा रिपोर्ट्स जलद पॉलिश प्रेझेंटेशनमध्ये रूपांतरित करू शकतात.
टीचर्स: लेक्चर नोट्समधून काही सेकंदात व्ह्युज्युअल आणि स्ट्रक्चर्ड लेसन तयार करू शकतात.
स्टूडेंट्स: त्यांचे एस्से किंवा प्रोजेक्ट्स आकर्षक स्लाइड्समध्ये रूपांतरित करू शकतात.
नवा स्मार्टफोन घ्यायचाय? मग थांबा, नोव्हेंबरमध्ये लॉन्च होताय 'हे' फोन
हे फीचर कधी उपलब्ध होईल?
गुगलने म्हटले आहे की, हे फीचर आता हळूहळू सुरू होत आहे आणि 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व यूझर्ससाठी उपलब्ध होईल. ते जेमिनी वेब (gemini.google.com) आणि मोबाइल वेबवर उपलब्ध असेल, अँड्रॉइड आणि iOS अॅप्स लवकरच येत आहेत.
हे फीचर जवळजवळ सर्व Google Workspace यूझर्सना (Business, Enterprise, Education आणि Nonprofits) मिळेल, तसेच Google AI Pro आणि Gemini Ultra सब्सक्राइबर्सना देखील याचं अॅक्सेस असेल.
