TRENDING:

या महिन्यात गुगल देणार मोठा धक्का, कोट्यवधी फोनमध्ये बंद होणार 'हे' अ‍ॅप

Last Updated:

गुगलचे अनेक अॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतात. अशातच गुगल युजर्सला मोठा धक्का देणार आहे. महिन्यात गुगलचं एक अॅप बंद होणार आहे. हे अॅप दुसरं कोणतं नसून गुगल कॅलेंडर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 19 डिसेंबर : गुगलचे अनेक अ‍ॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतात. अशातच गुगल युजर्सला मोठा धक्का देणार आहे. महिन्यात गुगलचं एक अ‍ॅप बंद होणार आहे. हे अ‍ॅप दुसरं कोणतं नसून गुगल कॅलेंडर आहे. लवकरच गुगल कॅलेंडर बंद करणार आहे. गुगल कॅलेंडरचा सपोर्ट फक्त अ‍ॅंड्रॉइड फोनवरच नाही तर ios वरही बंद होणार आहे.
या महिन्यात गुगल देणार मोठा धक्का
या महिन्यात गुगल देणार मोठा धक्का
advertisement

गुगल या महिन्यात जुन्या अँड्रॉईड फोन वापरकर्त्यांना मोठा धक्का देणार आहे. तुम्ही गुगल कॅलेंडर अ‍ॅपचे नियमित वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. गुगल काही जुन्या फोनसाठी गुगल कॅलेंडरला सपोर्ट करणं बंद करणार आहे. गुगल कॅलेंडरचा सपोर्ट फक्त अँड्रॉइड फोनवरच नाही तर iOS आणि कॉम्प्युटरवरही बंद होईल.

Redmi Note 13 Pro+ 5G चे फीचर्स आले समोर; मिळेल 200MP कॅमेरा

advertisement

जर तुमच्याकडे अँड्रॉईड फोन असेल ज्यामध्ये अँड्रॉइड ओरियो म्हणजेच 8.0 व्हर्जन असेल, तर तुमच्या फोनमधील गुगल कॅलेंडरचा सपोर्ट लवकरच बंद होईल. Google Calendar Android 8.0 वरील सर्व आवृत्त्यांमध्ये बंद असेल. जर तुमच्याकडे अँड्रॉइड 7.1 किंवा त्यापेक्षा कमी टॅबलेट असेल तर त्यामध्ये गुगल कॅलेंडरचा सपोर्टही बंद होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

सुरक्षेबाबत समस्या निर्माण झाल्यामुळे काही उपकरणांमध्ये गुगल कॅलेंडरचा सपोर्ट बंद केला जात असल्याचं सांगितलं जात आहे, कारण जुन्या अँड्रॉईड आवृत्त्यांसह फोन किंवा टॅबला सॉफ्टवेअर अपडेट मिळत नाहीत. अशा परिस्थितीत हॅकिंग आणि डेटा लीक होण्याचा धोकाही असतो. तुम्हाला याची जाणीव असावी की WhatsApp दरवर्षी काही उपकरणांसाठी वापर थांबवते. यावेळी देखील अनेक Android आणि iOS आवृत्त्यांसाठी बंद केलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
या महिन्यात गुगल देणार मोठा धक्का, कोट्यवधी फोनमध्ये बंद होणार 'हे' अ‍ॅप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल