Redmi Note 13 Pro+ 5G चे फीचर्स आले समोर; मिळेल 200MP कॅमेरा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Xiaomi चा सब-ब्रँड Redmi लेटेस्ट नोट सीरीज लॉन्च करणार आहे. यात Redmi Note 13 Pro+ 5G देखील लॉन्च केला जाईल.
मुंबई : Xiaomi चा सब-ब्रँड Redmi आपली लेटेस्ट नोट सीरीज लॉन्च करणार आहे. हा फोन भारतात 4 जानेवारीला लॉन्च होणार आहे, याची माहिती कंपनीनेच शेअर केली आहे. या सीरीजमध्ये, कंपनी तीन हँडसेट लॉन्च करेल. ज्यामध्ये टॉप एंड व्हेरिएंट Redmi Note 13 Pro+ 5G असेल. कंपनीने स्वतः त्याच्या अनेक स्पेसिफिकेशनविषयी माहिती दिली आहे.
Xiaomi India ने X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन सांगितलं की, Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये MediaTek Dimensity 7200 Ultra वापरला जाईल. या प्रोसेसरसह येणारा हा पहिला स्मार्टफोन असेल.
Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये मिळेल दमदार डिस्प्ले
कंपनीने आधीच माहिती शेअर केली आहे की, या हँडसेटमध्ये अनेक पॉवरफुल स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. कर्व्ड AMOLED डिस्प्ले Redmi Note 13 Pro+ मध्ये वापरला जाईल, जो 1.5K रिझोल्यूशनसह नॉक करेल. यामुळे चांगला व्यूइंग एक्सपीरियन्स मिळेल असा कंपनीचा दावा आहे.
advertisement
Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये मिळेल वीगर लेदर आणि फ्यूजन डिझाइन
Xiaomi India ने आधीच घोषणा केली आहे की, त्यात फ्यूजन डिझाइन असेल. त्याच्या मागच्या पॅनलवर व्हेगन लेदर, जे त्याला छान लुक देते. वीगन लेदरमध्ये तीन किंवा चार रंगांचे कॉम्बीनेशन वापरले जाऊ शकते. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.
advertisement
Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये मिळेल 200MP चा कॅमेरा
या फोनच्या लॉन्चिंगसाठी एक मायक्रोपेज तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये या हँडसेटचा लूक दाखवण्यात आलाय. यामध्ये बॅक पॅनलवर 200MP OIS कॅमेर्याचे बॅजिंग वापरले गेलेय. जे दर्शविते की यामध्ये 200MP कॅमेरा वापरला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2023 2:09 PM IST









