Realme Christmas Sale: रियलमीचा ख्रिसमस सेल सुरु! या जबरदस्त 5G स्मार्टफोन्सवर मिळतेय बंपर सूट

Last Updated:

Realme Christmas Sale: रियलमीने वर्ष संपण्यापूर्वी ख्रिसमस सेलची घोषणा केलीय. यात तुम्हाला भारी मोबाईल अगदी कमी किंमतीत मिळू शकतात.

रियलमी क्रिसमस सेल
रियलमी क्रिसमस सेल
नवी दिल्ली : नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असतो तेव्हा प्रत्येक जण तो स्वस्तात कसा मिळेल याचा शोध घेत असतो. अशा वेली विविध सणांनिमित्त असलेल्या ऑफर्स आपल्याला खूप कामी येतात. तुम्हीही नवा स्मार्टफोन शोधत असाल तर रियलमीच्या 5g स्मार्टफोनविषयी विचार करु शकता. कारण रियलमीने वर्ष संपण्यापूर्वी ख्रिसमस सेलची घोषणा केली आहे. हा सेल सोमवारपासून म्हणजेच 18 डिसेंबरपासून सुरु झालाय. ग्राहक 26 डिसेंबरपर्यंत क्रिसमस सेलचा फायदा घेऊ शकतात.
चीनी कंपनी Realme ख्रिसमस सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह आपले स्मार्टफोन विकतेय. तुम्ही Realme वेबसाइट आणि Amazon वर सूटचा फायदा मिळवू शकता.
Realme Narzo 60 Pro 5G
कंपनी Realme Narzo 60 Pro 5G फोनच्या बेस व्हेरिएंटवर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह 3,000 रुपयांची सूट देतेय. आता ते 20,999 रुपयांना खरेदी करता येईल. 100MP OIS ProLight कॅमेरा व्यतिरिक्त, या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
advertisement
Realme Narzo 60 5G
8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह Realme Narzo 60 5G फोनच्या बेस व्हेरिएंटवर 2,500 रुपयांची सूट दिली जातेय. आता तुम्ही हा फोन 15,499 रुपयांना खरेदी करू शकता. फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. तसेच 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आलाय. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
advertisement
Realme Narzo N55
6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह Realme Narzo N55 च्या एकमेव व्हेरिएंटवर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. सेल दरम्यान तुम्ही हा फोन 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. 33W फास्ट चार्जिंगसह, फोनची बॅटरी केवळ 29 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते.
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Realme Christmas Sale: रियलमीचा ख्रिसमस सेल सुरु! या जबरदस्त 5G स्मार्टफोन्सवर मिळतेय बंपर सूट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement