फक्त एक रिचार्ज आणि तब्बल 14 OTT फ्रीमध्ये पाहा; JIO चा जबरदस्त प्लॅन

Last Updated:

या प्लॅनमुळे युझर्स एका रिचार्जमध्ये 14 वेगवेगळ्या OTT अॅप्सचा आनंद घेऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या अॅप्सचं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.

जिओ टीव्ही प्रीमिअम प्लॅन
जिओ टीव्ही प्रीमिअम प्लॅन
नवी दिल्ली, 18 डिसेंबर :  बरेच लोक आता मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच अवलंबून आहे. त्यामुळे वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एखादा ओटीटी फ्रीमध्ये देतात. म्हणजे या ओटीटीचं सब्सस्क्रिप्शन घेण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत. पण जिओने असा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे, ज्यात एक नव्हे तर तब्बल 14 ओटीटी तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येतील.
रिलायन्स जिओने प्रीपेड युझर्ससाठी हे वर्ष संपण्यापूर्वी 3 नवीन जिओ टीव्ही प्रीमियम प्लॅन लाँच केले आहेत. जे युझर्सना मनोरंजनाचा पूर्ण आनंद देणार आहेत. या प्लॅनमुळे युझर्स एका रिचार्जमध्ये 14 वेगवेगळ्या OTT अॅप्सचा आनंद घेऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या अॅप्सचं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.
JioTV प्रीमियम प्लॅन रिचार्ज करून, अनेक वेगवेगळ्या OTT अॅप्सची सदस्यता खरेदी करण्याचा त्रास संपेल. Jio TV अॅपमध्ये साइन इन करून, OTT अॅप्ससाठी स्वतंत्र लॉगिन आणि पासवर्ड तयार करण्याची आणि लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही एकाच ठिकाणाहून वेगवेगळ्या अॅप्समधील सामग्री पाहू शकाल.
advertisement
कोणकोणते ओटीटी पाहता येणार?
Jio TV प्रीमियम प्लॅन्स अंतर्गत, तुम्हाला Jio Cinema Premium, Disney+Hotstar, Zee5, SonyLIV, प्राइम व्हिडिओ (मोबाइल), Lionsgate Play, Discovery+, DocuBay, SunNXT, Hoichoi, Planet Marathi, Chaupal, EpikOne यांसारख्या सुमारे 14 OTT  अॅप्सची सदस्यता मिळेल.
प्लॅनची किंमत
जिओच्या या प्लॅनची किंमत 398 रुपये, 1,198 रुपये आणि 4,498 रुपये आहे. हे प्लॅन वेगवेगळ्या वैधतेसह येतात, तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही प्लॅन निवडू शकता.
advertisement
398 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 12 OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल, 1,198 आणि 4,498 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, 398 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 28 दिवस आहे, तर 84 आणि 365 दिवसांची वैधता असलेल्या 1,198 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 4,498 रुपये आहे.
4,498 रुपयांचा प्लॅन घेतल्यावर तुम्हाला एका क्लिकवर कस्टमर केअर कॉल बॅकची सुविधाही मिळेल. इतकंच नाही तर या प्लॅन्समध्ये तुम्हाला डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा दिला जाईल. प्रत्येक प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा देखील मिळेल.
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
फक्त एक रिचार्ज आणि तब्बल 14 OTT फ्रीमध्ये पाहा; JIO चा जबरदस्त प्लॅन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement