TRENDING:

ChatGPT वापरुन कसं बनवायचं प्रॉफेशनल Resume? टीप्स आणि प्रॉमप्ट लगेच लक्षात ठेवा

Last Updated:

जर तुम्ही योग्य पद्धतीने प्रयत्न केले आणि काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्या, तर निवड होण्याची शक्यता वाढते. त्यातलीच एक ट्रिक म्हणजे तुमचं Resume/CV प्रोफेशनल आणि आकर्षक बनवणं. आणि यात तुमची मदत करू शकतं OpenAI चं ChatGPT.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल योग्य नोकरी मिळवणं खूप कठीण झालंय. स्पर्धा प्रचंड वाढली आहे आणि प्रत्येक कंपनीला अर्ज करणाऱ्या शेकडो उमेदवारांमध्ये स्वतःचं वेगळेपण दाखवणं ही गोष्ट गरजेची आहे. पण जर तुम्ही योग्य पद्धतीने प्रयत्न केले आणि काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्या, तर निवड होण्याची शक्यता वाढते. त्यातलीच एक ट्रिक म्हणजे तुमचं Resume/CV प्रोफेशनल आणि आकर्षक बनवणं. आणि यात तुमची मदत करू शकतं OpenAI चं ChatGPT.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

ChatGPT कसं मदत करू शकतं?

अनेकांना चांगलं रिज्युमे बनवणं अवघड वाटतं. पण ChatGPT मुळे हा प्रोसेस झटपट आणि सोपा होतो. मग तुम्ही पहिल्या नोकरीसाठी अर्ज करत असाल किंवा करिअर बदलण्याचा विचार करत असाल तर AI टूल तुमचं CV प्रोफेशनल दिसेल असं तयार करू शकतं.

आधी काय तयारी करावी?

ChatGPT ला प्रॉम्प्ट देण्याआधी काही गोष्टी तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे –

advertisement

तुमचं शिक्षण (Education)

मागील नोकरीचा अनुभव (Experience)

तुमच्याकडे असलेली कौशल्यं (Skills)

मिळालेले सर्टिफिकेट्स व अचीवमेंट्स (Certificates & Achievements)

ही माहिती जितकी डिटेलमध्ये द्याल तितकं तुमचं रिज्युमे आकर्षक बनेल.

आता समजा यात तुम्हाला लिहायचं असेल की “Handled Instagram and Facebook Campaigns” असं लिहिण्यापेक्षा “Ran Instagram and Facebook campaigns that increased followers engagement by 45% and brought in over 400 new leads in just seven months.” असं लिहिल्यास तुमचा प्रोफाईल खूप इम्प्रेसिव्ह दिसेल. त्यामुळे तुमचं रिझ्यूम सिलेक्ट होऊ शकतं.

advertisement

आता यासाठी काय आणि कसं प्रॉम्प्ट द्यायचं? चला जाणून घेऊ

स्पष्ट प्रॉम्प्ट द्या – ChatGPT अॅप किंवा वेबसाइट उघडा आणि एक स्वच्छ प्रॉम्प्ट लिहा.

उदा.: “Create a professional resume for a software engineer with 3 years of experience, skilled in Programming Languages, Data Structures and Algorithms, Object-Oriented Programming and Database Management. Include a short summary, education, work experience and skills.”

advertisement

लक्षात ठेवा – प्रॉम्प्ट कॉपी-पेस्ट न करता आपल्या माहितीप्रमाणे बदल करून द्या.

रिज्युमे वैयक्तिक बनवा, तयार झालेलं रिज्युमे वाचा आणि त्यात तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे टोन अॅडजस्ट करा. ChatGPT तुमचं काम सोपं करतं, पण रिज्युमे तुमचं प्रतिनिधित्व करणं महत्वाचं आहे.

डिझाइन आणि फॉरमॅटिंगसाठी मदत घ्या. जर तुम्हाला CV स्टायलिश किंवा मॉडर्न फॉरमॅटमध्ये हवं असेल तर तेही ChatGPT करून देऊ शकतं. क्लीन, मॉडर्न किंवा आकर्षक फॉरमॅट, जसं हवं तसं.

advertisement

आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त चांगलं शिक्षण आणि अनुभव पुरेसं नाही. योग्य पद्धतीने सादर केलेलं रिज्युमेच तुम्हाला मुलाखतीपर्यंत घेऊन जातं. आणि यात ChatGPT सारखी AI टूल्स तुमचं काम अर्धं करून सोपं करू शकतात.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
ChatGPT वापरुन कसं बनवायचं प्रॉफेशनल Resume? टीप्स आणि प्रॉमप्ट लगेच लक्षात ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल