TRENDING:

चुकून दुसऱ्यालाच मेल पाठवला? डोंट वरी, असं करु शकता अनडू 

Last Updated:

तुम्ही चुकून Gmail वर चुकीच्या पत्त्यावर ईमेल पाठवला तर घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही पाठवलेला ईमेल 30 सेकंदांच्या आत पूर्ववत करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही विद्यार्थी असाल किंवा काम करणारे प्रोफेशनल, प्रत्येकाला ईमेल पाठवावा लागतो. कधीकधी घाई किंवा निष्काळजीपणामुळे ईमेल वेगळ्या पत्त्यावर जातात. तुम्ही ही चूक केली तर घाबरून जाण्याची गरज नाही. Gmail मध्ये पाठवलेला ईमेल अनडू सेंट करण्याचा पर्याय आहे. याचा अर्थ तुम्ही ईमेल रद्द करू शकता, ज्यामुळे तो रिसिव्हरपर्यंत पोहोचू शकत नाही. आज आपण याची पद्धत जाणून घेऊया.
जीमेल
जीमेल
advertisement

हे फीचर कसे काम करते?

हे फीचर पूर्व-निर्धारित कालावधीसाठी ईमेल पाठवण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे यूझरला तो प्राप्तकर्त्याच्या इनबॉक्समध्ये पोहोचण्यापासून रोखता येते. हे फीचर Gmail च्या डेस्कटॉप आणि मोबाइल दोन्ही व्हर्जनवर उपलब्ध आहे आणि प्रक्रिया जवळजवळ सारखीच आहे.

आता एकाच फोनवर चालवू शकता 2 WhatsApp! मार्क जुकरबर्ग यांनी सांगितली ट्रीक

advertisement

पाठवलेला ईमेल कसा पूर्ववत करायचा?

तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरून ईमेल पाठवला असेल, तर तो पाठवल्यानंतर डाव्या कोपऱ्यात तळाशी "सेंट" बॉक्स दिसेल. त्यात "अनडू" ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्याने ईमेल पुन्हा उघडतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते एडिट करू शकता किंवा डिलीट करु शकता. त्याचप्रमाणे, ईमेल पाठवताच तुमच्या मोबाइल फोनवर सेंट नोटिफिकेशन येते. त्यात "अनडू" ऑप्शन देखील आहे. तुम्ही पाठवलेला ईमेल टॅप करून तो पूर्ववत करू शकता.

advertisement

WiFi राउटर वापरणाऱ्यांनो सावधान! डेटा चोरीचा धोका, सरकारचा इशारा

कँसिलेशन टाइम कसा वाढवायचा?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात झपाट्याने बदल, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

जीमेल यूझर्सना पाठवलेले ईमेल अनडू करण्यासाठी कालावधी सेट करण्याची परवानगी देखील देते. हे करण्यासाठी, जीमेल उघडा आणि गियर आयकॉनवर क्लिक करा किंवा टॅप करा. सी ऑल सेटिंग वर जा. "अनडू सेंड" पर्याय "सामान्य" टॅब अंतर्गत दिसेल. तुम्ही कँसिलेशन टाइम वेळ 5 ते 30 सेकंदांमध्ये सेट करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
चुकून दुसऱ्यालाच मेल पाठवला? डोंट वरी, असं करु शकता अनडू 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल