सध्या, फक्त इमेजेज व्हेरिफाय केल्या जातील
सध्या, हे फीचर फक्त गुगलच्या एआय टूल्ससह तयार केलेल्या प्रतिमा व्हेरिफाय करू शकते. फोटो व्हेरिफाय करण्यासाठी ते गुगलच्या अदृश्य वॉटरमार्किंग टेक्नॉलॉजी, सिंथआयडी वापरते. गुगल म्हणते की, ते लवकरच व्हिडिओ आणि ऑडिओ व्हेरिफाय करण्याचा पर्याय जोडेल. जेमिनी व्यतिरिक्त, गुगल हे त्याच्या सर्च सर्व्हिसेसमध्ये इंटीग्रेट करण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे जेमिनी अॅप वापरत नाहीत अशा यूझर्सना या फीचरचा फायदा घेता येईल.
advertisement
Google Gemini 3 मध्ये मिळालेय हे जबरदस्त फीचर्स! सर्चमध्ये दिसेल इंटरॅक्टिव्ह रिझल्ट
हे फीचर कसे काम करेल?
तुम्हाला एखादी इमेज एआय द्वारे तयार केली आहे किंवा एडिट केली आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर ती जेमिनी वर अपलोड करा. अपलोड केल्यानंतर, टेक्स्ट बॉक्समध्ये "ही इमेज एआय द्वारे तयार केली आहे का?" हा प्रॉम्प्ट टाइप करा आणि तो पाठवा. त्यानंतर गुगल जेमिनी त्याचा सिंथआयडी व्हेरिफाय करेल आणि तुम्हाला प्रतिमेचा संपूर्ण कॉन्टेक्स्ट प्रदान करेल. रिपोर्टनुसार, सध्या, फक्त गुगलच्या एआय टूल्स वापरून तयार केलेल्या प्रतिमा व्हेरिफाय केल्या जाऊ शकतात, परंतु भविष्यात, इतर सोर्ससाठी सपोर्ट जोडले जाऊ शकते, ज्यामुळे ते चॅटजीपीटी सारख्या टूल्स वापरून तयार केलेल्या फोटोही व्हेरिफाय करू शकेल.
