पण खरं पाहिलं तर इन्कॉग्निटो मोड मर्यादित प्रकारची गोपनीयता देतो. तुमचा इंटरनेट सेवा प्रदाता (ISP), ऑफिस किंवा कॉलेजचा नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर आणि तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइट्स यांना तुमच्या ऑनलाइन हालचालींचा काही प्रमाणात माग काढता येतोच. म्हणूनच, प्रायव्हेट मोड काय करतो आणि काय करत नाही हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
प्रायव्हेट ब्राउझिंग नेमकं काय करतं?
advertisement
इन्कॉग्निटो किंवा प्रायव्हेट विंडो उघडल्यावर ब्राउझर तुमच्या डिव्हाइसवर साठवल्या जाणाऱ्या काही गोष्टींवर नियंत्रण ठेवतो.
- ब्राउझर हिस्ट्री सेव्ह होत नाही, तुम्ही कोणत्या साइटला भेट दिली हे ब्राउझर रेकॉर्ड करत नाही.
- कुकीज आणि साइट डेटा तात्पुरता असतो. त्या सेशनमध्ये तयार झालेलं सर्व कुकी डेटा विंडो बंद करताच नष्ट होतं.
- ऑटोफिल किंवा फॉर्म एंट्री सेव्ह होत नाही. लॉगिन आयडी, फॉर्म्स किंवा पासवर्ड लोकल स्टोरेजमध्ये जात नाहीत.
शेयर्ड किंवा सार्वजनिक कॉम्प्युटर वापरताना उपयुक्त, तुमचा ब्राउझिंगचा मागमूस मशीनवर राहत नाही, त्यामुळे सुरक्षितता थोडी वाढते.
मात्र प्रायव्हेट मोड काय करत नाही? "प्रायव्हेट" नाव असूनही हा मोड पूर्णपणे गुप्तता देत नाही. त्याच्या काही मर्यादा आहेत
तुमचा ISP किंवा ऑफिस नेटवर्क तुम्हाला ट्रॅक करू शकतो. तुमचा सर्व इंटरनेट ट्रॅफिक ISP किंवा नेटवर्क अॅडमिनच्या सर्व्हरमधून जातो. त्यामुळे ते तुम्ही कोणत्या साइट्सला भेट देता हे पाहू शकतात.
तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइट्स तुम्हाला ओळखू शकतात. वेबसाइट्स ट्रॅकिंग टूल्स, लॉगिन अकाउंट किंवा डिव्हाइस आयडीद्वारे तुमची ओळख जोडू शकतात.
तुमचा IP अॅड्रेस लपवत नाही
तुमच्या लोकेशनचा माग IP अॅड्रेसने काढता येतो. इन्कॉग्निटो मोड तो लपवत नाही. त्यासाठी VPN सारखी साधने आवश्यक असतात.
सायबर अटॅकपासून संरक्षण करत नाही. मॅलवेयर, फिशिंग, की-लॉगर किंवा हॅकिंगपासून हा मोड तुम्हाला सुरक्षित करत नाही.
इन्कॉग्निटो मोड हा फक्त तुमच्या डिव्हाइसवर ब्राउझिंगचा पुरावा न राहण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्हाला इंटरनेटवर अदृश्य बनवत नाही, ट्रॅकिंगपासून वाचवत नाही, हॅकिंगपासून सुरक्षित ठेवत नाही. जर खरोखर प्रायव्हसी हवी असेल तर VPN, अँटीव्हायरस, सिक्युअर ब्राउझर, आणि सुरक्षित ब्राउझिंग सवयी या गोष्टी अधिक प्रभावी ठरतात.
