पण आता इंस्टाग्राम फक्त फोटो, रील्स पाहाण्यापूर्त नसून यावर आता गेमिंगचा मजाही घेता येणार आहे. हो, इंस्टाग्रामने एक नवीन फीचर आणलं आहे, ज्यामुळे तुम्ही कोणतंही अॅप डाऊनलोड न करता थेट इंस्टाग्रामवर गेम्स खेळू शकता. तेही एकदम फ्री!
नवीन फीचरमुळे इंस्टाग्रामवर वेळ घालवणं अधिक मजेशीर होणार आहे. खास म्हणजे हे गेम खेळण्यासाठी कोणतीही अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही, फक्त काही स्टेप्स फॉलो करा आणि खेळा गेम्स.
advertisement
गेम सुरू करण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम, आपल्या मोबाईलमधील Instagram अॅप ओपन करा.
नंतर एखादी पर्सनल किंवा ग्रुप चॅट उघडा.
चॅटमध्ये एक इमोजी सिलेक्ट करून सेंड करा.
तो इमोजी काही सेकंद प्रेस करून ठेवा आणि गेम आपोआप सुरू होईल.
गेम कसा खेळायचा?
जेव्हा गेम सुरू होईल, तेव्हा तुम्ही पाठवलेला इमोजी स्क्रिनवर उडताना दिसेल. हे इमोजी जमिनीवर पडू न देता कंट्रोल करावं लागेल. त्यासाठी स्क्रिनच्या खालच्या बाजूला एक स्लाइडर असेल, ज्याला उजवीकडे किंवा डावीकडे हलवून इमोजीला वाचवायचं आहे, जसं जसं तुम्ही इमोजी कंट्रोल कराल, तसंच तुमचं स्कोर वाढत जाईल.
हे फीचर खास का आहे?
इंस्टाग्रामचं हे नवीन गेमिंग फीचर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे जे सतत रील्स स्क्रोल करत कंटाळले आहेत आणि थोडी वेगळी मजा शोधत आहेत. काही मिनिटांतच हा गेम तुमचं मूड फ्रेश करू शकतो, असं मेटाचं म्हणणं आहे.
