हा Apple चा आतापर्यंतचा सर्वात बारीक (slimmest) iPhone ठरला आहे आणि यामुळेच तो सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
पण या फोनइतकाच चर्चेत आहे तो त्याचा डिझाइन तयार करणारा व्यक्ती अबिदुर चौधरी. Apple च्या या इंडस्ट्रियल डिझाइनरने iPhone Air ला खास टायटेनियम बॉडी आणि स्लीम डिझाइन दिले आहे, ज्यामुळे हा फोन हलका आणि स्टायलिश झाला आहे.
advertisement
आता यानंतर अबिदुर चौधरी खूपच ट्रेंड होऊ लागला आणि तो कोण आहे? काय आहे याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी लोक सर्च करु लागले.
चला जाणून घेऊ अबिदुर चौधरीबद्दल
अबिदुर चौधरीचा जन्म आणि शिक्षण लंडनमध्ये झाले. पण तो बांगलादेशी वंशाचा असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतो आणि डिझायनर म्हणून काम करतो समस्यांचे निराकरण करणे आणि नवनवीन कल्पना आजमावणे हे त्याचं आवडतं क्षेत्र आहे. त्यांचा उद्देश असा आहे की त्याने लोकांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवणारे प्रोडक्ट्स तयार करावेत.
शिक्षण आणि सुरुवातीचा प्रवास
अबिदुरने Loughborough University मधून Product Design & Technology मध्ये पदवी घेतली. विद्यार्थी जीवनात त्याने अनेक पुरस्कार जिंकले. 3D Hubs Student Grant, James Dyson Foundation Bursary, Kenwood Appliances Award आणि Seymour Powell Design Week मधील पहिला क्रमांक. 2016 मध्ये त्याला Plug and Play डिझाइनला Red Dot Design Award ने सन्मानित केलं गेलं.
करिअरची सुरुवात त्यांनी Cambridge Consultants आणि Curventa येथे इंटर्नशिपने केली. नंतर लंडनच्या Layer Design कंपनीत प्रोफेशनल डिझायनर म्हणून काम केले. 2018–19 दरम्यान त्यांनी स्वतःची Abidur Chowdhury Design कन्सल्टन्सी सुरू केली आणि विविध ब्रँड्स आणि स्टार्टअप्ससोबत काम केलं गेलं.
Apple सोबतचा प्रवास
जानेवारी 2019 मध्ये अबिदुर चौधरी याने Apple मध्ये इंडस्ट्रियल डिझाइनर म्हणून प्रवेश केला. क्यूपर्टिनो, कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी अनेक इनोवेटिव्ह प्रोजेक्ट्सवर काम केलं. यातीलच एक प्रोजेक्ट म्हणजे iPhone Air, ज्याने आज जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
iPhone Air हा सर्वात पातळ iPhone आहे. iPhone Air हा यापूर्वीच्या सर्व मॉडेल्सपेक्षा सुमारे एक तृतीयांश पातळ आहे. यात टायटेनियम बॉडी, हलकं वजन आणि आकर्षक डिझाइन आहे. डिव्हाइसमध्ये सिंगल कॅमेरा असून टेलीफोटो लेंस मिळते.
AI तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफी आणखी दर्जेदार होते. बॅटरी लहान असली तरी बॅटरी-सेव्हिंग सॉफ्टवेअर मुळे ती दिवसभर चालते.
iPhone Air ची सुरुवातीची किंमत ₹1,19,900 ठेवण्यात आली आहे (256GB वेरिएंटपासून). यासोबतच Apple ने iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max, AirPods Pro 3 तसेच तीन नवीन घड्याळे Apple Watch Series 11, Apple Watch SE 3 आणि Apple Watch Ultra 3 देखील बाजारात आणली आहेत.
एकंदरीत, iPhone Air हा फक्त Apple च्या 17 सीरिजचा भाग नसून, डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या जगातील नवा मैलाचा दगड ठरला आहे. आणि त्यामागे आहे एक तरुण, क्रिएटिव्ह डिझायनर अबिदुर चौधरी, ज्यांच्या कामामुळे आज Apple पुन्हा एकदा चर्चेत आहे.