चार्जिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा
ओरिजनल चार्जर: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी ओरिजनल चार्जरनेच आयफोन चार्ज करा. काही यूझर्स याकडे दुर्लक्ष करतात आणि नेहमीच कोणत्याही चार्जरने फोन चार्ज करतात. याचा परिणाम आयफोनच्या बॅटरीवर होतो.
Smartphone मध्ये व्हायरस आहे हे कसं ओळखायचं? ही आहे सोपी ट्रिक
एअरप्लेन मोड : आयफोन जुना असेल तर चार्जिंग करताना फोन एअरप्लेन मोडवर ठेवून चार्ज करण्याचा प्रयत्न करा. यामुळे, सर्व नेटवर्क कनेक्शन बंद होतात आणि बॅटरीवर कमी लोड पडतो. फोनवर काहीही चालू नसताना चार्जिंगची स्पीड वाढू शकते.
advertisement
फास्ट चार्जिंग: आयफोन चार्ज करण्यासाठी तुम्ही फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेले चार्जर वापरावे. जुने iPhone 8 किंवा त्यावरील मॉडेल फास्ट चार्जरने चार्ज केले जाऊ शकतात. तुम्ही 18W किंवा अधिक क्षमतेचा चार्जर घेऊ शकता.
Realme ला टक्कर देणार iQOO 13! फीचर्स आहेत जबरदस्त, किंमत पाहा किती
बॅकग्राउंडवर चालणारे ॲप्स: फोन चार्ज करताना पूर्णपणे फ्री ठेवावा, त्यात कोणतेही ॲप्लिकेशन चालू ठेवू नका, इंटरनेट आणि वायफाय बंद ठेवा. याशिवाय गेम्स बंद करा.
मोबाईल हीटिंग: फोन चार्जिंग दरम्यान गरम होत असेल तर फोनच्या मागील कव्हरमध्ये काही ठेवले आहे का ते तपासा, बरेचदा लोक त्यात पैसे, कार्ड इत्यादी ठेवतात, याशिवाय, मागील कव्हर जाड असेल तर ते काढून टाका आणि मग फोन चार्ज करा. यामुळे फोनला योग्य हवा मिळते आणि त्याचे तापमानही योग्य राहते.
बरेच लोक नवीन आयफोन घेतात पण जुन्या चार्जरने चार्ज करत राहतात. लक्षात ठेवा की लेटेस्ट आयफोन मॉडेल्स केवळ डेडिकेटेड चार्जरने चार्ज करा.
तुमचा आयफोन अजूनही हळू चार्ज होत असेल, तर तुमचा फोन Apple च्या सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा. यानंतर तुमची या समस्येपासून सुटका होईल.