Realme ला टक्कर देणार iQOO 13! फीचर्स आहेत जबरदस्त, किंमत पाहा किती
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
iQOO 13 Launched: स्मार्टफोन उत्पादक कंपनी Vivo च्या सब-ब्रँड IQOO (iQOO) ने आज भारतात आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन IQoo 13 (Iqoo 13) लॉन्च केला आहे.
iQOO 13 Launched: स्मार्टफोन उत्पादक कंपनी Vivo च्या सब-ब्रँड IQOO (iQOO) ने आज भारतात आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन IQOO 13 (Iqoo 13) लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. जो फोनची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करेल. यासोबतच फोनमध्ये AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन Realme GT 7 Pro सारख्या स्मार्टफोनला टक्कर देण्यास सक्षम असेल.
iQOO 13 Specifications
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, iQOO 13 मध्ये 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याशिवाय कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर लावला आहे. जो गेमिंगसाठी खूप चांगला मानला जातो. कंपनीने हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. कंपनीने 12GB+256GB आणि 16GB+512GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये iQOO 13 लॉन्च केला आहे.
advertisement
iQOO 13 Camera
या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, iQOO 13 मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील आहे. पॉवरसाठी, डिव्हाइसला 6,000mAh ची दमदार बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते. डिव्हाइसला Monster Halo लाइट प्रदान करण्यात आला आहे. जो फोनच्या कॅमेऱ्यांच्या आसपास ठेवला आहे. कॉल किंवा मेसेज आल्यावर हा लाइट आपोआप लागतो.
advertisement
किंमत किती आहे
आता या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर iQOO 13 च्या 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 51,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिव्हाइसच्या 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 56,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची प्री-बुकिंग 5 डिसेंबरपासून Amazon वर सुरू होईल. 11 डिसेंबर 2024 पासून स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे.
advertisement
Realme GT 7 Pro ला टक्कर मिळेल
iQOO 13 स्मार्टफोन Realme च्या नुकत्याच लाँच झालेल्या GT 7 Pro फोनशी स्पर्धा करेल. Realme GT 7 Pro मध्ये 6.78 इंच 8T LPTO Samsung Eco2 1.5K OLED पंच होल स्क्रीन आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 6500 nits आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी दिली जात आहे.
advertisement
फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, पहिला कॅमेरा 50MP IMX906 OIS सेन्सरसह येतो. त्याच वेळी, फोनमध्ये 50MP पेरिस्कोप लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. डिव्हाइसमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. कंपनीने या फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट दिला आहे.
हा फोन Android 15 वर बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम OriginOS वर काम करतो. याशिवाय, फोनमध्ये 5800mAh ची मोठी पॉवरफूल बॅटरी आहे. जी 120W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 65,999 रुपये आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 1:47 PM IST