Airtel चा 100 रुपयांपेक्षा कमीचा जबरदस्त प्लॅन! पाहा यात काय काय मिळतंय

Last Updated:

Airtel ने नुकताच आपल्या कोट्यवधी यूजर्ससाठी स्वस्त प्लॅन आणला आहे. 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लॅनमध्ये यूझर्सना कोणत्याही लिमिटशिवाय इंटरनेट डेटा दिला जातो.

एअरटेल
एअरटेल
मुंबई : Airtel ने अलीकडेच आपल्या कोट्यवधी मोबाईल यूझर्ससाठी अनेक जबरदस्त प्लॅन्स लॉन्च केले आहेत. एअरटेलचा असाच प्लॅन 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत आहे. ज्यामध्ये यूजर्सना इंटरनेट वापरण्यासाठी अनलिमिटेड डेटा दिला जातो. जुलैमध्ये मोबाइल रिचार्ज प्लॅन महाग झाल्यापासून, मोठ्या संख्येने Jio, Airtel आणि Vodafone Idea यूझर्स त्यांचे नंबर बंद करत आहेत किंवा BSNL वर पोर्ट करत आहेत. महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे अनेक युजर्सनी एअरटेल देखील सोडले आहे.
100 रुपयांपेक्षा कमीचा प्लॅन
टेलिकॉम ऑपरेटरने आपले यूझर्स टिकवून ठेवण्यासाठी विविध ऑफर जाहीर केल्या आहेत. एअरटेलचा असाच एक रिचार्ज प्लॅन आहे, ज्यासाठी यूझर्सला फक्त 99 रुपये खर्च करावे लागतील. टेलिकॉम ऑपरेटर आपल्या यूझर्सना 99 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट ऑफर करत आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट देण्यात आले आहे. मात्र, या प्लॅनमध्ये यूजर्सला फक्त 2 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. कंपनीने यूझर्ससाठी FUP लिमिट देखील सेट केली आहे.
advertisement
या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 20GB इंटरनेट ॲक्सेस मिळेल. या प्लॅनचा लाभ फक्त आधीपासून चालू असलेल्या कोणत्याही योजनेसोबतच घेता येईल. उदाहरणार्थ, तुमच्या नंबरवर प्लॅन आधीपासूनच अॅक्टिव्ह असल्यास, तुम्ही हा प्लॅन निवडू शकता. एअरटेलने खासकरून इंटरनेट यूझर्सना लक्षात घेऊन हा प्लॅन लॉन्च केला आहे.
advertisement
जिओ ऑफर
Airtel प्रमाणे, Jio कडेही असाच स्वस्त प्लॅन आहे. ज्यासाठी यूझर्सला 100 रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागतो. जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड इंटरनेट डेटाचा लाभ मिळणार आहे. हा प्लॅन 86 रुपयांचा आहे आणि Airtel प्रमाणे तुम्हाला दररोज 20GB डेटाचा लाभ मिळेल.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Airtel चा 100 रुपयांपेक्षा कमीचा जबरदस्त प्लॅन! पाहा यात काय काय मिळतंय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement