जिओ फॅमिली प्लॅनमध्ये काय आहे खास?
जिओचा हा फॅमिली पोस्टपेड प्लॅन फक्त ₹499 मध्ये उपलब्ध आहे आणि यात तुम्ही तीन मोबाईल सिम एकाच कनेक्शनखाली जोडू शकता. म्हणजेच प्रत्येक सिमसाठी वेगळं रिचार्ज करण्याची गरज उरत नाही.
या प्लॅनमध्ये प्रायमरी सिमला 75GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. तसेच प्रत्येक अतिरिक्त सिमसाठी 5GB एक्स्ट्रा डेटा मिळतो. म्हणजे जर तुम्ही तीन सिम जोडले, तर संपूर्ण कुटुंबाला 85GB (75GB + 5GB + 5GB) इतका डेटा वापरता येतो.
advertisement
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते आणि कोणत्याही नेटवर्कवर देशभरात कॉल करता येतो. याशिवाय, प्रत्येक सिमवर दररोज 100 मोफत SMS मिळतात.
या प्लॅनसोबत सध्या कंपनीने Jio 9th Anniversary Celebration Offerही आणला आहे, ज्यामुळे हा प्लॅन अधिकच फायदेशीर ठरतो.
या ऑफरअंतर्गत यूजर्सना अनेक फ्री सर्व्हिसेस आणि सबस्क्रिप्शन्स मिळतात जसे की JioHotstarचं फ्री सबस्क्रिप्शन, JioHome आणि JioSaavnचा 2 महिन्यांसाठी मोफत प्रवेश, तसेच JioTV आणि JioCinema सारख्या लोकप्रिय जिओ अॅप्सचं फ्री ऍक्सेस.
म्हणजेच फक्त ₹449 महिन्याच्या खर्चात तुम्हाला डेटा + अनलिमिटेड कॉलिंग + एंटरटेनमेंटचं पूर्ण कॉम्बो मिळतं. या एका प्लॅनमुळे संपूर्ण कुटुंब कायम कनेक्टेड राहतं आणि वेगवेगळे रिचार्ज करण्याचा त्रासही संपतो.
