आज आम्ही तुम्हाला जिओच्या दोन रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला जिओचे हे प्लॅन्स दीर्घ वैधतेसह मिळतील आणि तेही कमी पैशात. Jio चे हे दोन प्लॅन 90 आणि 98 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि कमी पैशात डेटा असे अनेक फायदे मिळणार आहेत. चला याविषयी जाणून घेऊया.
WhatsAppने व्हिडिओ कॉलिंगमध्ये दिलंय आणखी भारी फीचर, कसं वापरायचं?
advertisement
जिओचा प्लॅन 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह
तुम्ही Jio चा प्लॅन 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण 90 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळेल. यासोबतच तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील. एवढेच नाही तर Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 20 GB अतिरिक्त डेटा देखील दिला जातो, जो तुम्ही पूर्ण व्हॅलिडिटीमध्ये कधीही वापरू शकता.
Google Map चं नवीन फीचर युजर्ससाठी सुटकेचा श्वास; पाहून नेटकरी म्हणाले, 'याला बोनस देऊन टाक यार....'
जिओचा प्लॅन 98 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह
तुम्ही Jio चा प्लॅन 999 रुपयांमध्ये 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह खरेदी करू शकता. जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण 98 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळेल. यासोबतच तुम्हाला दररोज 2 GB डेटा आणि दररोज 100 मोफत SMS देखील मिळतील. या रिचार्जमध्ये Jio आपल्या ग्राहकांना Jio TV आणि Jio Cinema चे सबस्क्रिप्शन देखील ऑफर करते. जर तुम्हाला मनोरंजनाची आवड असेल तर तुम्हाला हा प्लॅन खूप आवडेल.
