WhatsAppने व्हिडिओ कॉलिंगमध्ये दिलंय आणखी भारी फीचर, कसं वापरायचं?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WhatsApp Low Light Mode: व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करताना तुम्हाला व्हिडिओच्या खराब क्वालिटीच्या समस्येचा सामना करावा लागला आहे का? आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. या समस्येवर मात करण्यासाठी व्हॉट्सॲपने लो-लाइट मोड नावाचे नवीन फीचर आणलेय. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
मुंबई : WhatsApp हे एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. जे जगभरातील लाखो लोक वापरतात. लोकांशी संपर्क साधण्याचा हा एक मजेदार मार्ग आहे. कंपनी आपल्या यूझर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फीचर आणत असते, जी त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असतात. लोकांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलिंगची सुविधा मिळते. पण, व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करताना तुम्हाला व्हिडिओच्या खराब गुणवत्तेच्या समस्येचा सामना करावा लागला आहे का? आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. या समस्येवर मात करण्यासाठी व्हॉट्सॲपने लो-लाइट मोड नावाचे नवीन फीचर जोडले आहे. त्याविषयी आपण जाणून घेऊया.
लो-लाइट मोड म्हणजे काय?
WhatsAppने व्हिडिओ कॉलिंग सुधारण्यासाठी नवीन अपडेट जारी केले आहे. या अपडेटचे एक खास फीचर म्हणजे यात नवीन लो-लाइट मोड आहे. हे एक फीचर आहे जे कमी लाइटमध्येही व्हिडिओ कॉलची गुणवत्ता सुधारते. आता तुम्ही अंधाऱ्या खोल्यांमध्येही तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत स्पष्ट व्हिडिओ कॉल करू शकता. या अपडेटमध्ये केवळ लो-लाइट मोडच नाही तर व्हिडिओ कॉलसाठी अनेक नवीन फिल्टर आणि बॅकग्राउंडही जोडण्यात आले आहेत. आता तुम्ही व्हिडिओ कॉल आणखी मजेदार करू शकता.
advertisement
लो लाइट मोड कसा काम करतो?
जेव्हा तुम्ही लो लाइट मोड चालू करता, तेव्हा WhatsApp तुमचा व्हिडिओ आपोआप अॅडजस्ट करते जेणेकरून तुमचा चेहरा आणि परिसर स्पष्टपणे दिसतील. या मोडच्या मदतीने कमी प्रकाशातही यूझर्सचा चेहरा स्पष्टपणे दिसतो.
लो-लाइट मोड कसा चालू करायचा?
1. प्रथम WhatsApp उघडा.
2. यानंतर व्हिडिओ कॉल सुरू करा.
3. व्हिडिओ कॉल फूल स्क्रिन करा.
advertisement
4. नंतर लो-लाइट मोड चालू करण्यासाठी वरच्या उजव्या कोपऱ्यातील बल्ब चिन्हावर टॅप करा.
5. आता तुम्ही कमी प्रकाशातही कोणत्याही समस्येशिवाय व्हिडिओ कॉल करू शकता.
6. ते बंद करण्यासाठी, बल्ब चिन्हावर पुन्हा क्लिक करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2024 5:15 PM IST










