Google Map चं नवीन फीचर युजर्ससाठी सुटकेचा श्वास; पाहून नेटकरी म्हणाले, 'याला बोनस देऊन टाक यार....'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गुगल मॅपचा वापर करून प्रवासादरम्यान टोल कसा वाचवता येईल आणि शॉर्टकट मार्ग कसा शोधता येईल, हे या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
मुंबई : बऱ्याचदा आपण अनोळखी रस्त्यांवर प्रवास करतो. अशा रस्त्यांवर प्रवास करताना आपण गुगल मॅपची मदत घेतो. गुगल मॅप हे सर्वांत लोकप्रिय अॅप आहे. बहुतांश व्यक्ती प्रवास करताना या अॅपचा वापर करतात. सोशल मीडियावर सध्या गुगल मॅपसंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात मॅपमधल्या नवीन फीचरची माहिती दिली गेली आहे. गुगल मॅपचा वापर करून प्रवासादरम्यान टोल कसा वाचवता येईल आणि शॉर्टकट मार्ग कसा शोधता येईल, हे या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना गुगल मॅपचा वापर केला जातो; पण गुगल मॅपमध्ये काही अशी फीचर्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही टोल वाचवू शकता आणि शॉर्टकट रस्त्यांविषयी माहिती घेऊ शकता. सोशल मीडियावर गुगल मॅपशी संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहेत आहे. त्यात एका व्यक्तीने गुगल मॅपच्या नवीन फीचरविषयी माहिती दिली आहे.
advertisement
उद्धव परब नावाच्या एका लिंक्डइन युझरने गुगल मॅपचा स्क्रीनशॉट शेअर करून अॅपच्या नवीन फीचरचं कौतुक केलं आहे. या छायाचित्रात दिसत असलेलं 'टेक फ्लायओव्हर' नावाचे पॉप अप खूप उपयुक्त असल्याचं युझरने सांगितलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही वाहतूक कोंडीतून वाचू शकता. मॅपचा सल्ला ऐकला तर घरी वेळेत पोहोचू शकता. लिंक्डइन युझरने हे छायाचित्र पोस्ट करताना लिहिलं आहे, की 'ज्या व्यक्तीने गुगल मॅप्सवर टेक फ्लायओव्हर हे पॉप अप जोडलं आहे, त्याला गुगल कंपनीने दिवाळीचा बोनस द्यावा.' या पोस्टला आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये 200 पेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत.
advertisement

टोलचा खर्च वाचवण्यासाठी उपयुक्त असलेल्या या फीचरचा वापर करण्याकरिता तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अॅव्हॉइड टोल या ऑप्शन अॅक्टिव्ह करावा लागेल. त्यानंतर नो टोल रोडसाठी पर्यायी मार्ग दिसेल. तसंच गुगल मॅपच्या या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही हायवे किंवा एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करताना अनेक नवीन गोष्टीदेखील जाणून घेऊ शकता.
advertisement
दरम्यान, इंटरनेट युझर्सनी या फीचरसाठी गुगल मॅपचं कौतुक केले आहे. एका व्यक्तीनं कमेंट करताना लिहिलं आहे, की 'हे फीचर एका व्यक्तीने नव्हे तर संपूर्ण टीमने तयार केलं असेल, असं मला वाटतं. यापूर्वी, हे फीचर युझर्सच्या प्रतिक्रिया किंवा मागणीसाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं.' दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहिलं आहे, की 'ही खूप चांगली सुविधा आहे. हायवेवर टोल प्लाझा आणि प्रवासासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत माहिती द्यावी. यामुळे टोल नाक्यावर किती पैसे द्यावे लागणार आहेत, याबाबत माहिती आधीच मिळेल.' कमेंट सेक्शनमध्ये युझर्सनी या नवीन फीचरचं कौतुक केलं असून अशा आणखी नवीन फीचर्सची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2024 10:21 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google Map चं नवीन फीचर युजर्ससाठी सुटकेचा श्वास; पाहून नेटकरी म्हणाले, 'याला बोनस देऊन टाक यार....'









