TRENDING:

नवी बजाज पल्सर एन 150 लाँचिंगसाठी सज्ज, काय आहे या बाईकमध्ये खास?

Last Updated:

पल्सर एन 160 या बजाज कंपनीच्या बाइकने यशस्वी कामगिरी केली होती. ग्राहकांकडून ती चांगल्या प्रकारे स्वीकारली गेली आणि तिला अनेक पुरस्कारही मिळाले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : पल्सर एन 160 या बजाज कंपनीच्या बाइकने यशस्वी कामगिरी केली होती. ग्राहकांकडून ती चांगल्या प्रकारे स्वीकारली गेली आणि तिला अनेक पुरस्कारही मिळाले होते. 2022चा बाइक ऑफ दी इयर हा पुरस्कारही या बाइकला मिळाला होता. या बाइकचं छोटं भावंड असलेल्या पी 150 ची सुरुवात मात्र अवघड स्वरूपात झाली. 150 प्लॅटफॉर्म ग्राहकांसाठी अधिक आकर्षक ठरण्याकरिता बजाज कंपनीने नवी मोटरसायकल आणली आहे.
News18
News18
advertisement

डीलरशिप शोमध्ये टिपण्यात आलेल्या फोटोजमधून असं दिसून आलं आहे, की बजाजची नवी पल्सर बाइक लाँचिंगसाठी तयार आहे. त्या बाइकवर बजाज पल्सर एन 150 अशा नावाचा स्टिकर होता. याविषयी अधिक जाणून घेऊ या. 'ऑटोकार इंडिया डॉट कॉम'ने या संदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नावावरून पाहायला गेलं, तर बाइकला पल्सर एन 160कडून अधिक अ‍ॅग्रेसिव्ह बॉडीवर्क मिळालेलं आहे. अधिक अँग्युलर आणि स्पोर्टी प्रोजेक्टर हेडलॅम्प, मोठी टँक एक्स्टेंशन्स आणि टेल सेक्शन यांचा त्यात समावेश आहे.

advertisement

डीलरशिपमध्ये दिसलेल्या दोन्ही पल्सर एन 150 बाइक्सना सिंगल पीस सीट होती. तसंच, सिंगल डिस्क पल्सर 150कडून मिळालेलं अधिक कन्व्हेंशनल ग्रॅब हँडलही होतं. ही बाइक एक की दोन व्हॅरिएंट्समध्ये उपलब्ध होते का ते पाहावं लागेल. ड्युएल डिस्क व्हॅरिएंट उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही व्हॅरिएंट्समध्ये सिंगल चॅनेल एबीएस असण्याची शक्यता आहे.

advertisement

royal enfield : अजून काय हवंय! आवडती बुलेट घेऊन जा फक्त 1200 रुपयांमध्ये, सुपर असा प्लॅन

पॉवरट्रेनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, एन 150 या बाइकला पी 150 सारखंच इंजिन वापरलं जाण्याची शक्यता आहे. 14.5 एचपी आणि 13.5 एनएमची निर्मिती करणारं स्मूद इंजिन या बाइकला असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्याला फाइव्ह स्पीड गिअरबॉक्सही असेल.

advertisement

सर्व न्यू एज पल्सर्समध्ये असलेल्या सेमी डिजिटल युनिटप्रमाणेच या नव्या बाइकलाही इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. कलर्सच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास एन 150 लाल आणि पांढऱ्या रंगाच्या स्कीममध्ये आढळली. पी 150प्रमाणे बजाज पाच कलर्स याही बाइकमध्ये उपलब्ध करते का ते पाहायचं.

बजाज पल्सर पी 150ची एक्स शोरूम किंमत सध्या 1.17 लाख रुपयांपासून सुरू होते. तसंच पल्सर एन 160ची एक्स शोरूम किंमत 1.3 लाख रुपयांपासून सुरू होते. नव्या बजाज पल्सर एन 150ची किंमत पी 150पेक्षा पाच ते सात हजार रुपयांनी जास्त असण्याची शक्यता आहे; मात्र एन 160च्या किमतीपेक्षा हिची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. लवकरच या नव्या बाइकची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
नवी बजाज पल्सर एन 150 लाँचिंगसाठी सज्ज, काय आहे या बाईकमध्ये खास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल