चिंताजनक बाब अशी आहे की, सर्व लोकप्रिय अँड्रॉईड व्हर्जन्स रिस्कसाठी संवेदनाक्षम आहेत. याचा अर्थ जर तुमच्याकडे अँड्रॉईड 11, 12, 12L किंवा अलीकडील 13 व्हर्जन चालणारे फोन असतील, तर तुम्ही सिक्युरिटी इश्युज आणि त्यांच्या संभाव्य परिणामाचा धोका पत्करत आहात.
95 टक्क्यांहून अधिक भारतीय स्मार्टफोन युजर्स अँड्रॉईडचा वापर करतात. ज्यामुळे हँडसेट उत्पादक आणि सरकारसाठी या नवीन सुरक्षितता त्रुटी एक प्रमुख चिंतेचा विषय बनल्या आहेत. अँड्रॉईड युजर्स निश्चितपणे या समस्येमुळे प्रभावित झाले आहेत. सीईआरटी-इननं स्पष्टपणे सांगितलं की, गुगल प्ले सिस्टीम आणि क्वॉलकॉम घटकांच्या फ्रेमवर्कमधील त्रुटींशी त्याचा अधिक संबंध आहे.
advertisement
iPhone 15 series मधून युजर्सना नवीन काय मिळणार? थोड्याच वेळात होणार मोठा खुलासा
गुगल हा मुख्य स्रोत आहे ज्यानं या सुरक्षा त्रुटी ओळखल्या आहेत. या समस्येचं लवकरातलवकर निराकरण करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी सुरक्षा पॅच सोडण्याचं काम करणं अत्यावश्यक आहे. सुरक्षिततेच्या समस्येबद्दल सर्व तपशील माहिती असल्यानं गुगलला त्वरित निराकरण करण्यात मदत झाली आहे.
कंपनीनं नुकतेच सप्टेंबर 2023 चे अपडेट जारी केले आहे. हे अपडेट अँड्रॉईड युजर्सच्या डिव्हाईसला प्रभावित करणाऱ्या सुरक्षितता त्रुटींपासून सुरक्षित करतं.
गुगलनं सर्व अँड्रॉईड फोन निर्मात्यांना विशिष्ट सुरक्षा जोखमीची पूर्तता करणार्या पॅच स्ट्रिंगसह एक नवीन अपडेट रोल आउट करण्यास सूचित केलं आहे. अँड्रॉईड युजर्सनी त्यांच्या फोन ब्रँडनुसार नवीन अँड्रॉईड अपडेट तपासले पाहिजे. हे अपडेट तुमच्या प्रदेशात पोहोचण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
लाँच आधी Apple iPhone 15 चे फीचर्स लीक, डिझाइन ते किंमत पाहा डिटेल्स एका क्लिकवर
अँड्रॉईड फोनमध्ये नवीन सिक्युरिटी अपडेट कसं इन्स्टॉल करावं?
- तुमच्या फोनमधील सेटिंग्जमध्ये जा.
- सिस्टिम अपडेटसाठी खाली स्क्रोल करा.
- 'चेक फॉर अपडेट'वर क्लिक करा.
- स्क्रीनवर पॉपअप झाल्यास नवीन व्हर्जन इन्स्टॉल करा.
- तुमचा फोन सुरक्षित करण्यासाठी फोन रिस्टार्ट करा.
तुम्ही नवीन सिक्युरिटी अपडेट इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुमच्या फोनमध्ये पुरेशी बॅटरी (किमान 40 टक्के) असल्याची खात्री करा. युजर्सना थर्ड-पार्टी अॅप स्टोअरमधून अॅप्स इन्स्टॉल न करण्याचा आणि अज्ञात सेंडर्सकडून आलेल्या ईमेल आणि लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला गुगलनं दिला आहे.
