फोनमध्ये सेटिंग बदला
तुमचा फोन चोरी जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला तसं सेटिंग करावं लागेल. सर्वांत आधी तुमचा स्मार्टफोन चालू करा आणि त्यातील सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जा.
थोडं स्क्रोल केल्यावर तिथे तुम्हाला गुगल नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला दोन सेक्शन दिसतील. त्यापैकी ऑल सर्व्हिसेस नावाच्या सेक्शनवर क्लिक करा.
advertisement
त्यानंतर तुम्ही आणखी थोडं खाली स्क्रोल केलं की तिथे तुम्हाला ‘थेफ्ट प्रोटेक्शन’ नावाचा एक पर्याय दिसेल. यात तुम्हाला सर्वात वर दोन ऑप्शन दिसतील. पहिल्या ऑप्शनमध्ये ‘थेफ्ट डिटेक्शन लॉक’ असेल. हे ऑप्शन एनेबल करा.
हे सेटिंग बदलल्यानंतर कोणीही तुमचा फोन डिटेक्ट केला की तो लॉक होईल. यातील दुसऱ्या ऑप्शनमध्ये डिव्हाईस लॉक आहे. हा ऑप्शन एनेबल केल्यावर जर तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणी तुमचा फोन वापरण्याचा प्रयत्न केला तर तो आपोआप लॉक होईल.
फोनमधील रिमोट लॉक ऑप्शन
रिमोट लॉक फीचर खूप फायद्याचे आहे. तुमचा फोन चोरीला गेल्यावर ते फीचर त्याला android.com/lock लिंकवर नेते. तुम्ही जेव्हा त्याचा सेटअप करता तेव्हा तो मोबाईल नंबर मागेल. मोबाईल नंबर आणि सिक्युरिटी चॅलेंजबरोबर हे फीचर वापरता येते. समजा जर तुमचा फोन चोरी झाला आहे, तर तुम्ही दुसऱ्या फोनवरून तुमचा चोरीला गेलेला फोन लॉक करू शकता. असे केल्याने चोर तुमचा फोन अनलॉक करू शकणार नाही.
ऑफलाईन डिव्हाईस लॉक फीचर
ऑफलाईन डिव्हाईस लॉक फीचर फोन सुरक्षित ठेवते. हे फीचर तुमच्या फोनचे इंटरनेट बंद असताना काम करते. समजा तुमचा फोन चोरीला गेला तेव्हा त्याचा डेटा बंद असेल, त्यावेळी तुम्ही या फंक्शनच्या मदतीने फोनचा गैरवापर होणे रोखू शकता.
