TRENDING:

OnePlusचा सर्वात भारी स्मार्टफोन झाला लॉन्च! 24GB रॅमसह 100W ची चार्जिंग

Last Updated:

OnePlus 13 कंपनीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे. हा फोन पॉवरफूल फीचर्ससह आहे आणि लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येतो. हे लवकरच भारतात लॉन्च केले जाऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : OnePlus ने आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 13 चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन पॉवरफूस फीचर्सने सुसज्ज आहे आणि लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येतो. यात क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामुळे तो खास बनतो.
वनप्लस लॉन्च
वनप्लस लॉन्च
advertisement

चला जाणून घेऊया या लेटेस्ट OnePlus फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीविषयी सविस्तर.

नॉर्मल सिम आणि e-SIM मध्ये फरक काय? दोन्हीमधून कोणतं बेस्ट

OnePlus 13 चे स्पेसिफिकेशन काय आहेत?

OnePlus 13 मध्ये 2K रिझोल्यूशनसह 6.82-इंच LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 4500 nits आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये 24GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा ऑप्शन आहे, ज्यामुळे तो फ्लॅगशिप डिव्हाइसमधून एक बनतो.

advertisement

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP मेन कॅमेरा, 50MP पेरिस्कोपिक कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये मोठी 6000mAh बॅटरी आहे, जी 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

BSNL चं गिफ्ट! लॉन्च झाला वर्षभराचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

advertisement

हे डिव्हाइस IP69 रेटिंगसह येते. ज्यामुळे ते पाणी आणि धूळपासून संरक्षित होते. यात अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित OxygenOS 15 सह लॉन्च करण्यात आला आहे आणि लवकरच तो ग्लोबल मार्केटमध्ये देखील लॉन्च केला जाऊ शकतो.

OnePlus 13 ची किंमत किती आहे?

OnePlus 13 चीनमध्ये चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत 4,499 युआन (अंदाजे रुपये 53,200) आहे. त्याच्या 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4,899 युआन (अंदाजे रुपये 57,900) आहे. तर, 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,299 युआन (अंदाजे 62,600 रुपये) आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

24GB रॅम आणि 1TB स्टोरेज ऑफर करणाऱ्या सर्वात प्रीमियम व्हेरिएंटची किंमत 5,999 युआन (अंदाजे रु 70,900) आहे. हा स्मार्टफोन तीन कलरच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. OnePlus चे हे नवीन फ्लॅगशिप डिव्हाइस प्रीमियम यूझर्ससाठी त्याच्या पॉवरफूल फीचर्स आणि मोठ्या बॅटरी बॅकअपसह एक उत्तम पर्याय बनू शकते.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
OnePlusचा सर्वात भारी स्मार्टफोन झाला लॉन्च! 24GB रॅमसह 100W ची चार्जिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल