OnePlus, Redmi आणि Realme सारख्या कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन दाखल होणार आहेत. अधिकृत लॉन्च होण्यापूर्वीच, आगामी स्मार्टफोन्ससाठी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर मायक्रोसाइट्स तयार करण्यात आल्या आहेत.
500 रुपयांपेक्षा कमीमध्ये Airtel-Jio देतेय 22 आणि OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन, पहा डिटेल्स
Redmi 14c 5G लाँच डेट
Redmi ब्रँडचा हा नवीन 5G फोन पुढील महिन्यात 6 जानेवारी 2025 रोजी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच केला जाऊ शकतो. लाँच झाल्यानंतर हा फोन Xiaomi च्या अधिकृत साइट Mi.com वर आणि Flipkart वर देखील विकला जाईल.
advertisement
Realme 14 Pro सीरीज लाँच डेट
Realme ची नवीन सीरीज पुढील महिन्यात जानेवारीमध्ये लाँच होणार आहे. या सीरीजमध्ये Realme 14 Pro आणि Realme 14 Pro Plus हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या फ्लिपकार्टवर ही सीरीज जानेवारीमध्ये लाँच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे, मात्र लॉन्चच्या तारखेची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
फ्लिपकार्टवर फोनसाठी एक स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे, ज्यावरून या सीरिजमध्ये कलर चेंजिंग डिझाइन, क्वाड कर्व्ह डिस्प्ले, 1.5k डिस्प्ले रिझोल्यूशन यांसारखी खास फीचर्स देण्यात येणार असल्याचे दिसून येते.
Jio ने 'या' प्लॅन्सची व्हॅलिडिटी केली कमी, रिचार्ज करण्यापूर्वी अवश्य करा चेक
OnePlus 13 लाँच डेट
OnePlus 13, OnePlus 12 चं अपग्रेड व्हर्जन, 7 जानेवारी 2025 रोजी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च केली जाईल. या आगामी फोनसाठी ॲमेझॉनवर एक वेगळी मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. ज्यावरून असे दिसून आले आहे की या फोनमध्ये AI फीचर्स, स्नॅपड्रॅगन 8 एलिट मोबाइल प्लॅटफॉर्म प्रोसेसर, 6000mAh बॅटरी यासारखे दमदार फीचर्स असतील.
OnePlus 13R लाँच डेट
हा OnePlus फोन 7 जानेवारीला OnePlus 13 सोबत लॉन्च होईल. ॲमेझॉनवर फोनसाठी बनवलेल्या मायक्रोसाइटवरून समोर आले आहे की, फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
फोनमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी 6000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे, याशिवाय OnePlus च्या या आगामी आणि लेटेस्ट फोनमध्ये तुम्हाला AI फीचर्सचा सपोर्ट मिळेल.
