तुमच्याकडे Redmi च्या पोर्टफोलिओमध्ये स्वस्त आणि महागडे दोन्ही फोन आहेत. Redmi Note 12 Pro हा कंपनीचा लोकप्रिय स्मार्टफोन आहे. Xiaomi ने कमी किमतीत या फोनमध्ये दमदार फीचर्स दिले आहेत. तुम्हाला असा स्मार्टफोन घ्यायचा असेल ज्यामध्ये तुम्ही सामान्य रुटीन कामासोबतच तुमचे व्यावसायिक काम करू शकत असाल तर हा फोन तुम्हाला अजिबात निराश करणार नाही.
advertisement
WhatsApp च्या या सेक्शनमध्ये आलंय नवं फीचर! तुमचं काम झालं आणखी सोपं
वर्षातील पहिला मोठा सेल, Monument Sale 2025, Flipkart मध्ये सुरू होणार आहे. हा सेल सुरू होण्याआधीच कंपनीने Redmi Note 12 Pro वर डिस्काउंट ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. सेल ऑफरमध्ये तुम्ही या फोनवर हजारो रुपये वाचवू शकता.
Flipkartमध्ये किंमत वाढली
Redmi Note 12 Pro वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनचा 256GB व्हेरिएंट सध्या 32,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. रिपब्लिक डे सेल सुरू होण्यापूर्वीच कंपनीने त्याची किंमत 43% ने कमी केली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही हा फोन फक्त 18,790 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फ्लॅट डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्ही सुमारे 15,000 रुपये वाचवू शकता.
तुम्हाला अधिक पैसे वाचवायचे असतील तर फ्लिपकार्ट ग्राहकांना बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. नेहमीप्रमाणे, तुम्हाला Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यावर 5% कॅशबॅक दिला जात आहे. यासोबतच तुम्ही एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता.
Jio च्या दोन भारी ऑफर! यूझर्सला 2 वर्ष फ्रीमध्ये मिळणार या सर्व्हिस
Redmi Note 12 Pro ची फीचर्स
- हा स्मार्टफोन 2022 मध्ये लाँच झाला होता. यात 6.67 इंच AMOLED पॅनल आहे.
- डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि 900 nits चा पीक ब्राइटनेस आहे.
- आउट ऑफ द बॉक्स हा स्मार्टफोन Android 12 वर चालतो.
- कामगिरीसाठी कंपनीने त्यात Mediatek Dimensity 1080 प्रोसेसर दिला आहे.
- फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50+8+2 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
- Redmi ने सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.