advertisement

WhatsApp च्या या सेक्शनमध्ये आलंय नवं फीचर! तुमचं काम झालं आणखी सोपं

Last Updated:

WhatsApp हे जगातील सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन आहे. व्हॉट्सॲप आपल्या लाखो यूझर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत आहे. दरम्यान, कंपनीने व्हॉट्सॲपच्या चॅनल फीचरमध्ये युजर्सना एक नवीन सुविधा दिली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. जगभरातील 3.5 अब्जाहून अधिक लोक त्यांच्या प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी याचा वापर करतात. आपल्या यूझर्सच्या सोयीसाठी, व्हॉट्सॲप सतत त्यात नवनवीन फीचर जोडत आहे. पोल फीचर कंपनीने प्लॅटफॉर्मवर 2022 मध्ये सादर केले होते. आता कंपनीने यात एक नवीन फीचर दिले आहे.
तुम्ही व्हॉट्सॲपचे पोल फीचर वापरत असाल तर आता तुमचा अनुभव बदलणार आहे. व्हॉट्सॲपच्या पोल फीचरमध्ये आतापर्यंत यूजर्सना फक्त टेक्स्टमध्ये पोल करण्याचा ऑप्शन होता, पण आता यात बदल होणार आहे. आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरबद्दल सविस्तर माहिती देऊ.
advertisement
WABetaInfo ने माहिती दिली
व्हॉट्सॲप पोलमध्ये येणाऱ्या नवीन फीचरची माहिती WABetaInfo या कंपनीच्या अपडेट्स आणि आगामी फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइटने शेअर केली आहे. वेबसाइटच्या नवीन रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, कंपनी आपल्या बीटा यूझर्सना Android व्हर्जन 2.25.1.17 साठी नवीन प्रकारची सुविधा प्रदान करणार आहे.
WABetaInfo ने खुलासा केला आहे की, व्हॉट्सॲप पोलमध्ये आता टेक्स्टसह फोटोंचा ऑप्शन असेल. म्हणजे आता युजर्स फोटोच्या माध्यमातूनही मतदान करू शकतील. व्हॉट्सॲपच्या आगामी अपडेटमध्ये यूझर्स पोलमधील मजकुरासोबत फोटो अटॅच करू शकतील. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, व्हॉट्सॲप पोलचे हे फीचर अशा परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकते जिथे सर्व काही केवळ टेक्स्टमध्ये सांगता येत नाही.
advertisement
WABetaInfo नुसार, हे फीचर सध्या विकासाच्या टप्प्यात आहे आणि कंपनीने ते बीटा यूझर्ससाठी चाचणीसाठी आणले आहे. तसंच, चाचणी पूर्ण होताच ते सामान्य यूझर्ससाठी आणले जाईल अशी अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp च्या या सेक्शनमध्ये आलंय नवं फीचर! तुमचं काम झालं आणखी सोपं
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement