सर्वात कॉमन मिस्टेक म्हणजे, लोक नॉर्मली घाईघाईत फोनचा कॅमेरा हा बोटांनी स्वच्छ करतात. ज्यामुळे बोटांचे ठसे कॅमेरावर पडतात. दीर्घकाळ हीच चूक केली तर कॅमेरा खराब होऊ शकतो.
व्हॉट्सअॅपवर चॅटिंग होणार अधिक मजेदार;स्टीकर फीचर लवकरच होणार सुरू
त्यामुळे फोनचा कॅमेरा खराब होतो
सर्वात मोठी आणि सामान्यतः केलेली चूक म्हणजे तुम्ही फोनचा कॅमेरा घाईघाईने बोटांनी किंवा कोणत्याही कपड्याने सच्छ करतात. अशावेळी कॅमेरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणता कपडा वापरत आहात हे पाहणं खूप गरजेचं आहे.
advertisement
कोणते फॅब्रिक वापरायचे?
कोणत्याही स्मार्टफोनचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे त्याचा कॅमेरा. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नेहमी मायक्रोफायबर कापड वापरावे. हे लेन्स स्वच्छ ठेवते आणि स्क्रॅचपासून संरक्षण देखील करते. एक गोष्ट लक्षात ठेवा की या कापड व्यतिरिक्त तुम्ही सुती कापड देखील वापरू शकता परंतु कोणतेही रफ किंवा खराब दर्जाचे टिश्यू पेपर वापरू नका.
10 हजाराच्या आत मिळतोय 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा स्मार्टफोन, पाहा यादी
कॅमेरा लेन्स आणि लिक्विड
कॅमेरा लेन्स हलक्या हातांनी स्वच्छ कराव्यात आणि जबरदस्तीने साफ करू नये. कोणत्याही प्रकारचे लिक्विड किंवा पाण्याने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका, ही चूक तुम्हाला महागात पडू शकते आणि कॅमेरा देखील खराब होऊ शकतो. जर तुम्हाला लिक्विड वापरायचं असेल तर तुम्ही लेन्स क्लीनर किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस क्लीनर वापरू शकता.