WiFi स्पीड बूस्ट कोड
हे कोड तुमच्या डिव्हाइसचे WiFi रीफ्रेश करतात, जे तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगला वेग देतात. या कोडचे काम WiFi चं व्हर्जन रीफ्रेश करणे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या डायल पॅडवर जाऊन *#2663# डायल करावे लागेल. असे केल्यावर तुमच्या फोनमध्ये एक सेटिंग ओपन होईल. आता तुम्हाला फोनच्या काही सिक्रेट सेटिंग्ज दिसतील. येथून तुम्हाला मध्यभागी 'WiFi व्हर्जन रिफ्रेश' ऑप्शन देखील दिसेल. त्यावर क्लिक करताच तुमचा फोन आपोआप रीस्टार्ट होईल. अशा परिस्थितीत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, फक्त थोडी प्रतीक्षा करा आणि आता फोन चालू होताच डिव्हाइसचा WiFi वेग सुधारेल.
advertisement
Amazon नंतर Flipkart नेही केली रिपब्लिक डे सेलची घोषणा! हे मोबाईल मिळतील स्वस्तात
फोन फास्ट करण्यासाठी कोड
दुसरा कोड देखील खूप पॉवरफूल आहे. जो आपल्या डिव्हाइसची बॅकग्राउंड प्रोसेस आणि कॅशे क्लियर करण्यासाठी काम करतो. हा कोड टाकताच फोनची सिक्रेट सेटिंग ऑन होते. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये *#9900# डायल करावे लागेल. तुम्ही हे डायल करताच, “Dump State Log” किंवा “Clear Cache” चा ऑप्शन दिसेल. फक्त एकदा या ऑप्शनवर क्लिक करा. असे केल्याने तुमच्या फोनचा परफॉर्मेंस वाढेल.
20000 पेक्षाही कमी किंमतीत येतात हे 5 दमदार 5G स्मार्टफोन्स! फीचर्स आहेत जबरदस्त
फोनचा स्पीडही याप्रमाणे वाढवा
तुम्ही खूप ॲप्स वापरत असल्यास, यामुळे तुमचा फोन स्लो होऊ शकतो. त्यामुळे बॅकग्राउंड ॲप्स पहा आणि तुम्ही अधूनमधून वापरत असलेले ॲप्स बंद करा. जितकी जास्त ॲप्स RAM मध्ये राहतील, तितकी फोनची कार्यक्षमता कमी होईल. त्याच वेळी, जर तुम्ही फोनमधील कॅशे क्लिअर करणारे ॲप्स वापरत असाल तर ते आता काढून टाका. फक्त कोड पद्धत वापरून कॅशे क्लिअर करा.