पण असे अनेक लोक आहेत ज्यांना मोबाईलच्या फास्ट चार्जिंगमुळे किती नुकसान होते याची माहिती नसते. असे काही नुकसान देखील आहे ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन खराब होऊ शकतो, तुम्हालाही असे काही घडू नये असे वाटत असेल तर तुम्हाला याची माहिती अवश्य असायला हवीं.
OnePlus ते Realme पर्यंत! हे आहेत 3 हजार रुपयांच्या आतील बेस्ट Earbuds
advertisement
नुकसान :-
पहिलं नुकसान: तुम्हालाही बॅटरी थोडी कमी झाल्यावर फोन पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची सवय असेल तर ही सवय लगेच बदला. वारंवार फास्ट चार्जिंगमुळे, फोनमधील बॅटरीची लाइफ कमी होऊ लागते आणि जर असे झाले तर तुम्हाला माहित आहे की, बॅटरी बदलण्याची आवश्यकता असेल. बॅटरी बदलणे म्हणजे मोठा खर्चच असतो.
दुसरं नुकसान: फास्ट चार्जिंगमुळे फोनमध्ये पॉवर लवकर जाते. ज्यामुळे फोन वेगाने चार्ज होऊ लागतो, जो प्रत्येकाला आवडतो. पण फास्ट चार्जिंगमुळे फोनमध्ये जास्त उष्णता निर्माण होऊ लागते, ज्यामुळे फोनची बॅटरीच नाही तर फोनच्या इतर भागांनाही नुकसान होऊ शकते. तुम्हाला तर माहिती आहेच फोनची बॅटरी किंवा इतर कोणताही पार्ट खराब झाला तर मग खर्च हा पक्का असतो.
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
फायदे:-
पहिला फायदा: प्रत्येकाला फास्ट चार्जिंग फोन आवडतात. कारण फास्ट चार्जिंग फोन बॅटरी फास्ट चार्ज करून वेळ वाचवण्यास मदत करतात.
दुसरा फायदा: समजा आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला फोन हवा आहे आणि फोनची बॅटरी संपली तर? फास्ट चार्जिंगच्या मदतीने फोन फास्ट चार्ज होतो पण यासाठी तुम्ही फक्त फोनसोबत येणारा फास्ट चार्जर वापरावा.