TRENDING:

BSNL आता फ्रीमध्ये करणार फूल एंटरटेन! 500 लाइव्ह चॅनल्स आणि OTT मोफत

Last Updated:

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सर्व्हिस सुरू केली आहे. या सर्व्हिसमध्ये लोक 500 लाईव्ह चॅनेल पाहू शकतील. ही सर्व्हिस फायबर-आधारित इंटरनेटवर चालेल आणि अतिरिक्त डेटा शुल्क मोजले जाणार नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये एक नवीन अध्याय जोडत, भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने देशातील निवडक भागात प्रथमच फायबर-बेस्ट इंट्रानेट टीव्ही सेवा सुरू केली आहे. या सेवेला IFTV असे नाव देण्यात आले असून ती BSNL च्या फायबर-टू-द-होम (FTTH) नेटवर्कवर आधारित आहे. या नवीन सेवेअंतर्गत, BSNL आपल्या ग्राहकांना 500 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि पे टीव्ही कंटेन्ट हाय क्वालिटीमध्ये प्रदान करत आहे. यामुळे मनोरंजनाला नवी दिशा तर मिळेलच, पण इंटरनेटवरील खर्चही कमी होईल.
बीएसएनएल
बीएसएनएल
advertisement

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने अलीकडेच आपला नवीन लोगो तसेच 6 नवीन सर्व्हिसेसचे अनावरण केले आहे. या सर्व्हिसमध्ये प्रमुख म्हणजे फायबर-आधारित इंट्रानेट टीव्ही सेवा, ज्याला IFTV (इंटरनेट फायबर टीव्ही) असे नाव देण्यात आले आहे.

iPhone 15 च्या किंमतीत मोठी घसरण! डिस्काउंटसह मिळतोय फक्त 35 हजारात

BSNL ने सध्या मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये ही सेवा सुरू केली आहे. जिथे ग्राहक 500 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेलचा आनंद घेतील. याशिवाय, BSNL च्या IFTV सेवेअंतर्गत टीव्ही स्ट्रीमिंगसाठी वापरला जाणारा डेटा यूझर्सच्या डेटा पॅकमधून कापला जाणार नाही. त्याऐवजी, IFTV सर्व्हिस अनलिमिटेड डेटासह प्रदान केली जात आहे. ही सुविधा BSNL FTTH ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दिली जात आहे.

advertisement

OTT आणि इतर मनोरंजन सुविधा

बीएसएनएलची ही नवीन सेवा केवळ लाईव्ह चॅनेलपुरती मर्यादित नाही. कंपनीने या सेवेमध्ये Amazon Price Video, Disney Plus Hotstar, Netflix, YouTube आणि Zee5 सारखे प्रमुख OTT प्लॅटफॉर्म देखील जोडले आहेत. याशिवाय बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी गेमिंगची सुविधाही उपलब्ध असेल. मात्र, ही सेवा सध्या फक्त अँड्रॉइड टीव्हीवरच काम करेल. ज्या ग्राहकांच्या टीव्हीमध्ये Android 10 किंवा त्यावरील व्हर्जन आहे ते Google Play Store वरून BSNL Live TV ॲप डाउनलोड करून या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात.

advertisement

Jioचा भारी रिचार्ज प्लॅन! 84 दिवसांची व्हॅलिडिटीचा प्लॅन मिळतोय स्वस्तात

हे करताना BSNLचा काय विचार होता?

BSNL चे हे पाऊल या वर्षाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलेल्या इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन (IPTV) सेवेचा विस्तार आहे. कंपनीच्या मते, या नवीन उपक्रमाचा उद्देश सेवा सुरक्षित, परवडणारी आणि विश्वासार्ह बनवणे आहे. यासह, BSNL ने 'नॅशनल वाय-फाय रोमिंग सर्व्हिस' नावाची आणखी एक सुविधा सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ग्राहक देशभरातील BSNL हॉटस्पॉटवर हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांचा डेटा खर्च कमी करू शकतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत फुलांना सोन्याचं मोलं, शेवंती, झेंडू खायोत भाव, गुलाबाचा दर काय?
सर्व पहा

या नवीन IFTV सर्व्हिसद्वारे BSNL केवळ डिजिटल मनोरंजनाच्या जगात महत्त्वाचे स्थान निर्माण करत नाही तर ग्राहकांना अधिक परवडणारा आणि विश्वासार्ह ऑप्शन देखील प्रदान करत आहे. ही सेवा BSNL ग्राहकांना एक उत्तम अनुभव देण्याचे वचन देते, जिथे त्यांना त्यांची आवडती सामग्री पाहण्यासाठी डेटा शुल्काची चिंता करावी लागणार नाही.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
BSNL आता फ्रीमध्ये करणार फूल एंटरटेन! 500 लाइव्ह चॅनल्स आणि OTT मोफत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल