या पैकी एका कंपनीची एक कार अशी देखील आहे जी शांतपणे पण वेगानं पुढे जात आहे. ही कार लाँच होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, प्रत्येक महिन्यात तिची सरासरीपेक्षा जास्त विक्री होत आहे. कंपनीनं एकदा या गाडीला फेसलिफ्टही केलं आहे. 'ह्युंदाई व्हेन्यू' असं या गाडीचं नाव आहे. विशेष बाब म्हणजे, कंपन्या त्यांच्या कारला सीएनजीचा पर्याय देत असताना ह्युंदाई व्हेन्यू आजही केवळ पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह बाजारात उपलब्ध आहे. या कारची किंमतही हॅचबॅक कारपेक्षा कमी आहे आणि मायलेजच्या बाबतीत ती इतरांना मागे टाकते.
advertisement
पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह मिळणारी व्हेन्यू शहरी भागांतील ग्राहकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. कॉम्पॅक्ट बॉक्सी डिझाईन आणि उत्कृष्ट फीचर्समुळे व्हेन्यूची विक्री वेगानं वाढत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, नवीन कार लाँच होताना जितका वेटिंग पीरियड असतो तितकाच वेटिंग पीरियड मागणीमुळे आताही तीन वर्षांनंतर व्हेन्यूसाठी निर्माण झाला आहे.
किती आहे वेटिंग पीरियड?
तुम्ही आता ह्युंदाई व्हेन्यू बुक केल्यास, तुम्हाला 30 आठवडे म्हणजे सुमारे 5 ते 6 महिने वाट पाहावी लागेल. व्हेन्यूच्या प्रत्येक व्हेरियंटमध्ये जवळपास हीच स्थिती आहे. तिच्या बेसपासून ते टॉप व्हेरियंटपर्यंत प्रत्येक व्हेरियंटला खूप मागणी आहे आणि दर महिन्याला मागणी वाढत असल्यानं वेटिंग पीरियड वाढत आहे.
व्हेन्यूची किंमत किती आहे?
व्हेन्यू ही गाडी सर्वात परवडणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे आणि तिची सुरुवातीची किंमत 7.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 13.48 लाख रुपये आहे. या गाडीची थेट स्पर्धा टाटा नेक्सॉन, किया सॉनेट आणि मारुती सुझुकी फिनिक्सशी आहे.
शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज
व्हेन्यूच्या इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीनं नुकताच त्यात 1.2 लिटर नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिनचा पर्याय दिला होता. याशिवाय, आधीपासून अस्तित्वात असलेल्या 1.0 लिटर टर्बो आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनसह देखील ही गाडी उपलब्ध आहे. पेट्रोलवर 20 ते 22 किमी प्रतिलिटर आणि डिझेलवर 26 किमी प्रतिलिटरपर्यंतचं मायलेज ही गाडी देते. कंपनीनं 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड DSG गिअरबॉक्ससह ही कार ऑफर केलेली आहे.
प्रीमियम कारसारखे फीचर्स
व्ह्युंदाई व्हेन्युमध्ये एकापेक्षा जास्त फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्हाला व्हेन्युमध्ये हाय एंड एसयूव्हीमध्ये आढळणारी फीचर्स बघायला मिळतील. कंपनीनं कारमध्ये ADAS देखील दिली आहे. यासोबतच तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्ज, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, चाइल्ड लॉक, एबीएस, ईबीडी, क्लायमेट कंट्रोल एसी, रिअर सीट रिक्लायनर आणि आर्मरेस्ट यांसारखी अनेक फीचर्स गाडीमध्ये मिळतील.