आता बहुतांश व्यवहार डिजिटल झाले आहेत. बँका, वित्तीय संस्थांकडून ऑनलाईन व्यवहारांमध्ये सुरक्षितता असावी यासाठी ओटीपी पाठवले जातात, मात्र घोटाळेबाजांकडून ते ओटीपी मिळवून गैरव्यवहार केले जातात. हे थांबवण्यासाठी ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना नव्या नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. या नव्या नियमांअंतर्गत बँका, अर्थसंस्था, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स यांच्याद्वारे पाठवण्यात येणारे सगळे व्यावसायिक संदेश ट्रेस केले जावेत, असं ट्रायनं म्हटलं आहे.
advertisement
रिचार्ज पुन्हा महाग होणार? Airtel च्या MDची टॅरिफ वाढवण्याची मागणी
या नव्या नियमांतर्गत स्पॅम मेसेज, कॉल्स रोखण्यासाठी कारवाई करावी, असे आदेश ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. ट्रायचे नवे नियम या आधी एक नोव्हेंबरपासून लागू होणार होते. रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल यांना हे नवे नियम लागू होणार होते. आता त्याला थोडी मुदतवाढ मिळाली असून, ते एक डिसेंबरपासून लागू होतील.
ट्रायच्या नव्या नियमांतर्गत बँका, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि अर्थसंस्थांच्या सर्व व्यवहारांच्या आणि सेवांच्या संदेशांची ट्रेसेबिलिटीची नोंद ठेवण्यात येईल. ट्रेसेबिलिटी नियमांचं पालन करताना त्यात व्यावसायिक संदेशांचाही समावेश केला जाणार आहे. म्हणजेच त्यात वन टाईम पासवर्ड अर्थात ओटीपीही असेल. हे संदेश जर नियमांचं पालन करून पाठवले गेले नाहीत, तर त्यांना ब्लॉक केलं जाईल, असं ट्रायनं म्हटलं आहे. यामुळे ओटीपीही ब्लॉक होऊ शकतात.
BSNL चं गिफ्ट! लॉन्च झाला वर्षभराचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
टेलिकॉम कंपन्यांना ट्रायने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यांना काही कीवर्ड्स ओळखण्यास सांगण्यात आलं आहे. ते नंबर कंपनी आधीच ब्लॉक करेल. ट्रायच्या नव्या नियमांमुळे मेसेज, लिंक पाठवून ग्राहकांना फसवणं, ओटीपी मिळवून ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे चोरणं याला लगाम बसू शकतो. ट्रायने हे नियम लागू करण्यासाठी एक ऑक्टोबर ही तारीख आधी निश्चित केली होती. मात्र, त्याला मुदतवाढ देऊन ती एक नोव्हेंबरऐवजी आता एक डिसेंबर अशी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या एक डिसेंबरपासून हे नियम लागू होतील, अशी आशा करायला हरकत नाही. यामुळे ग्राहकांची फसवणूक काही प्रमाणात कमी होऊ शकेल.
