हा स्कॅम कसा काम करतो?
फसवणूक करणारे नेटफ्लिक्स यूझर्सना मेसेज पाठवतात आणि त्यांना धमकी देतात की त्यांनी पेमेंट न केल्यामुळे त्यांचे अकाउंट बंद केले जाईल. मग ते यूझर्सना बनावट वेबसाइटवर घेऊन जातात आणि पैसे आणि अकाउंटची माहिती विचारतात.
भारत सरकारचा इशारा! या 4 नंबवरुन कॉल आल्यास लगेच करा कट, अन्यथा...
advertisement
Bitdefender ने फसवणूक करणाऱ्यांनी पाठवलेले काही बनावट मेसेज उघड केले आहेत. हे मेसेज खऱ्या Netflix मेसेजसारखे दिसतात. उदाहरणार्थ, 'NETFLIX: तुमच्या पेमेंटमध्ये समस्या आली आहे. कृपया येथे तुमची माहिती कंफर्म करा: https://account-details[.]com'
लोक त्यांची माहिती देतात, तेव्हा फसवणूक करणारे त्यांची Netflix माहिती आणि क्रेडिट कार्ड डिटेल्स चोरतात आणि ते डार्क वेबवर विकतात. मग ते फसवणूक करण्यासाठी किंवा लोकांची अकाउंट ताब्यात घेण्यासाठी या माहितीचा वापर करू शकतात.
iPhone 16 वर मिळतंय बंपर डिस्काउंट! Amazon वर 25 हजारांची सूट
सुरक्षित कसे राहायचे?
- नेटफ्लिक्सच्या नावाने येणाऱ्या मेसेज आणि ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
- नेटफ्लिक्सच्या मूळ वेबसाइटवर स्वतः जा. तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवा आणि मजबूत पासवर्ड तयार करा.
- तुमच्या फोन आणि कम्प्यूटरवर सेफ्टी सॉफ्टवेअर स्थापित करा.
- तुम्ही चुकून एखाद्या फेक लिंकवर क्लिक केले असेल, पण तुमची माहिती दिली नसेल, तर तुम्ही सुरक्षित आहात. पण जर तुम्ही तुमची माहिती दिली असेल तर लगेच तुमचा पासवर्ड बदलून बँकेला कळवा.