भारत सरकारचा इशारा! या 4 नंबवरुन कॉल आल्यास लगेच करा कट, अन्यथा...
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
दूरसंचार विभागाने लोकांना आंतरराष्ट्रीय फोन कॉल्सबाबत सावध केले आहे. लोकांना काही फोन नंबरपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. लोक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात आणि भरपूर पैसा गमावतात अशा बातम्या रोज येत असतात. हे गुन्हेगार अनेकदा लोकांना धमकी देतात की त्यांनी पैसे न पाठवल्यास त्यांना “डिजिटल अटक” केली जाईल. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून हे लोक अनेकदा परदेशातून काम करतात. भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना या फसवणुकीबद्दल सांगत आहेत. अलीकडे, दूरसंचार विभागाने लोकांना आंतरराष्ट्रीय फोन कॉल्सबद्दल इशारा दिला आहे.
या 4 अंकांपासून दूर राहा
लोकांना फोन नंबरपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे ज्यांचा कोड +77, +89, +85, +86 किंवा +84 आहे. हे नंबर फसवणूक करणाऱ्यांचे असू शकतात. दूरसंचार विभाग आणि ट्रायने लोकांना अशा कॉलची तक्रार करण्यास सांगितले आहे. तुम्ही Sanchar Saathi पोर्टलला भेट देऊन तक्रार करू शकता. याच्या मदतीने सरकार हे नंबर ब्लॉक करू शकते आणि इतर लोकांना वाचवू शकते.
advertisement
विद्यार्थ्याची फसवणूक
अलीकडे, एका 25 वर्षीय विद्यार्थ्याला एक कॉल आला ज्यामध्ये कॉलरने आपली ओळख TRAI या सरकारी एजन्सीचा पोलीस अधिकारी म्हणून दिली. फसवणूक करणाऱ्याने विद्यार्थ्याला धमकी दिली की त्याच्या फोन नंबरवर तक्रार नोंदवली गेली आहे आणि पोलिसांकडून विशेष सर्टिफिकेट न घेतल्यास त्याचा नंबर ब्लॉक केला जाईल. विद्यार्थी घाबरला आणि त्याने आपली बँक डिटेल्स फसवणूक करणाऱ्याला दिली. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
advertisement
भारत सरकारच्या रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगारांनी या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत सुमारे 2,140 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हे गुन्हेगार ईडी, सीबीआय, पोलीस किंवा आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून लोकांना फसवतात आणि त्यांच्याकडून पैसे घेतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2024 9:46 AM IST