बऱ्याच वेळा असे होते की, घाईघाईत पाठवलेल्या मेसेजमध्ये छोट्या चुका होतात किंवा कधीकधी आपल्याला मेसेजचा टोन थोडा बदलायचा असतो. जसे की तो व्यावसायिक असावा, किंवा मजेदार किंवा भावनिक असावा. अशा परिस्थितीत, आता व्हॉट्सअॅपवरील हे नवीन एआय फीचर हे काम करेल. खास गोष्ट म्हणजे व्हॉट्सअॅप तुमचा मेसेज स्टोअर करणार नाही, त्यामुळे तुमची प्रायव्हसी पूर्णपणे सुरक्षित राहील.
advertisement
Jio सह Airtel 'या' राज्यांना देणार मोफत कॉलसह डेटा आणि रोमिंग; तुम्हाला मिळणार?
Writing Help फीचर
जेव्हा तुम्ही मेसेज टाइप करता तेव्हा चॅट बॉक्समध्ये एक पेन्सिल आयकॉन दिसेल. तुम्ही त्यावर टॅप करताच, मेटा एआय तुम्हाला 3 ते 4 नवीन सूचना देईल. या सूचनांमध्ये प्रोफेशनल, फनी, सपोर्टिव्ह किंवा प्रूफरीड असे वेगवेगळे टोन असतील. तुम्ही यामधून तुम्हाला हवे ते निवडू शकता आणि पाठवू शकता. व्हॉट्सअॅप म्हणते की, या प्रक्रियेत तुमची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित असेल. म्हणजेच, एआय फक्त सूचना देईल, ते तुमचे मेसेज स्टोअर किंवा वाचणार नाही.
कोणाला सर्वात जास्त फायदा होईल
विद्यार्थी - असाइनमेंट लिहिताना किंवा प्राध्यापकांना मेसेज लिहिताना.
नोकरी व्यावसायिक - बॉस किंवा क्लायंटना प्रोफेशनल पद्धतीने मेसेज पाठवण्यासाठी.
मित्र आणि कुटुंब - Funny किंवा Emotional चॅटसाठी.
ज्यांना इंग्रजीमध्ये मेसेज लिहिण्यास प्रॉब्लम येतात.
YouTubeवरुन कोट्यवधी रुपये कसे कमवायचे? चॅनेल मोनेटाइज करण्यासाठी फॉलो करा या ट्रिक
हे फीचर अशा प्रकारे काम करेल
Step 1: सर्वप्रथम Google Play Store किंवा App Storeवरून तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप अपडेट करा.
Step 2: आता कोणतेही चॅट उघडा आणि मेसेज टाइप करण्यास सुरुवात करा.
Step 3: टाइप करताना, तुम्हाला टेक्स्ट बॉक्समध्ये एक लहान पेन्सिल आयकॉन दिसेल.
Step 4: या आयकॉनवर टॅप करा आणि Meta AIकडून 3-4 वेगवेगळ्या सूचना मिळवा.
Step 5: तुम्ही मेसेज Professional, Funny, Supportive किंवा Proofread मोडमध्ये बदलू शकता.
Step 6: तुम्हाला आवडणारी सूचना निवडा आणि ती पाठवा.
