Jio सह Airtel 'या' राज्यांना देणार मोफत कॉलसह डेटा आणि रोमिंग; तुम्हाला मिळणार?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Airtelने सांगितले की, मुसळधार पाऊस आणि तीव्र हवामान परिस्थितीमुळे अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा तात्पुरता उपाय लागू करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : तुम्ही रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे यूझर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरंतर, जिओ आणि एअरटेलने पूरग्रस्त भागात राहणाऱ्या यूझर्ससाठी फ्री सर्व्हिस सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, या आठवड्यात, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने प्रीपेड प्लॅनची मुदत संपत असताना ऑटोमॅटिक तीन दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे, जेणेकरून यूझर्स त्वरित रिचार्ज न करता कनेक्ट राहू शकतील. म्हणजेच, एअरटेलने म्हटले आहे की, मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नेटवर्क सेवांवर झालेल्या परिणामामुळे हा तात्पुरता उपाय करण्यात आला आहे. जम्मू, काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशातील ग्राहकांना व्हॅलिडिटी विस्तारासह मोफत व्हॉइस आणि डेटा फायदे मिळत आहेत.
जिओ वापरकर्त्यांसाठी:
या आठवड्यात ज्या प्रीपेड मोबाइल आणि जिओहोम ग्राहकांना प्लॅनची मुदत संपत आहे त्यांना ऑटोमॅटिकली 3 दिवसांची व्हॅलिडिटी विस्तार देण्यात येईल. मोबाइल यूझर्सना दररोज 2GB हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय किंवा रिचार्जची आवश्यकता न पडता मिळेल. JioHome यूझर्सना त्यांच्या शेवटच्या व्हॅलिड योजनेच्या अतिरिक्त 3 दिवसांचा लाभ कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळेल.
advertisement
पोस्टपेड मोबाइल आणि JioHome यूझर्सना बिल पेमेंटसाठी 3 दिवसांचा ग्रेस पीरियड मिळेल. जेणेकरून त्यांची सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहील.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, Jio चे अभियांत्रिकी पथके नेटवर्कची मजबूती वाढवण्यासाठी आणि सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत.
advertisement
Airtel यूझर्ससाठी:
ज्या सर्व एअरटेल प्रीपेड ग्राहकांचे पॅक या आठवड्यात संपत आहेत. त्यांची वैधता ऑटोमॅटिक तीन दिवसांनी वाढवली जाईल. या कालावधीत, त्यांना त्यांचे खाते रिचार्ज केले किंवा नाही तरीही, त्यांना दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 1GB डेटा मिळेल. ग्रेस पीरियड दरम्यान रिचार्ज केले तरीही हे फायदे अॅक्टिव्ह राहतील.
advertisement
त्याच वेळी, एअरटेल पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांना त्याच भागात बिल भरण्यासाठी तीन दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला जात आहे. पूर आणि भूस्खलन सारख्या गंभीर हवामान घटनांमुळे प्रभावित झालेल्या यूझर्ससाठी अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारत सरकारने देशातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना जम्मू आणि काश्मीरमध्ये 2 सप्टेंबरपर्यंत ICR सुविधा अॅक्टिव्ह ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 3:35 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio सह Airtel 'या' राज्यांना देणार मोफत कॉलसह डेटा आणि रोमिंग; तुम्हाला मिळणार?


