मूळ आशयाला (Original Content) प्रोत्साहन देणार...
गुगलच्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मने माहिती दिली आहे की, YouTube पार्टनर प्रोग्राम (YPP) अंतर्गत "मोठ्या प्रमाणावर तयार केलेले (mass-produced) आणि तेच तेच (repetitive) व्हिडिओ ओळखण्याची आणि त्यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आता अधिक कठोर केली जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की YouTube ने नेहमीच मूळ आणि अस्सल आशयाला प्रोत्साहन दिले आहे आणि हे धोरण त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
advertisement
काय आहेत YouTube चे नवीन नियम?
YouTube च्या कमाई धोरणात आधीच स्पष्ट केले आहे की, YouTube वरून पैसे कमावणाऱ्या सर्व निर्मात्यांकडे मूळ आशय असणे आवश्यक आहे. नवीन धोरण दोन गोष्टींवर विशेष भर देते.
आशयाची मौलिकता (Originality of content) : दुसऱ्याचा आशय मोठ्या बदलांशिवाय वापरता येणार नाही. जरी तो घेतला असेल, तरी त्यात इतके बदल करणे आवश्यक आहे की, तो नवीन दिसावा आणि तो तुमचा स्वतःचा असावा.
पुनरावृत्ती होणारा आशय प्रतिबंधित (Repetitive content prohibited) : एकाच साच्यात बनवलेले, वारंवार पुनरावृत्ती होणारे आणि केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवलेले व्हिडिओ आता YouTube च्या नजरेत संशयाच्या घेऱ्यात येतील. यात कमी प्रयत्नात बनवलेले (low-effort content), क्लिकबेट थंबनेल्स आणि शिक्षण किंवा मनोरंजनाचा कोणताही उद्देश नसलेले व्हिडिओ समाविष्ट आहेत.
AI निर्मित आशयही रडारवर येणार का?
जरी YouTube ने याचा थेट उल्लेख केला नसला तरी, सध्याच्या ट्रेंडनुसार असे मानले जात आहे की, मानवी इनपुटशिवाय केवळ आवाज किंवा फीडबॅक समाविष्ट करणारे AI-निर्मित व्हिडिओ देखील या नवीन कठोर नियमावलीखाली येऊ शकतात.
YouTube ची ही कृती अशा सर्व लोकांना इशारा आहे, ज्यांना कमी प्रयत्नात अधिक कमाई करण्याची आशा होती. आता या प्लॅटफॉर्मवर केवळ कठोर परिश्रम, सर्जनशीलता आणि मूळ आशयच टिकेल.
हे ही वाचा : Personality Test: होय, तुमची मूठ बोलते! मुठीच्या प्रकारावरून ओळखा लोकांचं व्यक्तिमत्व, करा 'ही' खास टेस्ट!
