ठाण्यात सायबर फसवणूक
तज्ज्ञांच्या मते या लिंकवर क्लिक केल्यास फोनमध्ये आपोआप एपीके फाइल डाउनलोड होते. ही फाइल रिमोट अॅक्सेस अॅप असते जी इन्स्टॉल होताच हॅकरला फोनवर पूर्ण नियंत्रण मिळते. यामुळे बँक खात्याची माहिती, पासवर्ड आणि ओटीपी चोरी करून काही मिनिटांत बँक खाती रिकामे केली जातात.
साइबर विभागाचा सल्ला आहे की अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही एपीके, पीडीएफ किंवा झिप फाइल्स डाउनलोड करू नयेत. अधिकृत सरकारी चलान नेहमी लिंकच्या स्वरूपात असते फाइलच्या स्वरूपात नाही.
advertisement
काय काळजी घ्यावी?
1)मोबाईलमध्ये अननोन सोर्सेस बंद ठेवा,फक्त अधिकृत प्ले स्टोर वापरा.
2)संशयास्पद मेसेज तात्काळ डिलीट करा.
3)वाहनावर दंड आहे की नाही, अधिकृत पोर्टलवरून खातरजमा करा.
फसवणूक झाल्यास काय कराल?
1)त्वरित 1930 (नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइन) वर कॉल करा.
2)बँक खाते आणि कार्ड ब्लॉक करा.
3)जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा. महत्त्वाचे म्हणजे सावधगिरी बाळगा, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि फसवणुकीपासून सुरक्षित राहा.
