पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद त्या वेळी मिटला असला तरी आरोपींनी मनात राग धरून ठेवला होता. याच रागातून शुक्रवारी सायंकाळी दीपक आणि सागर कुरे यांनी पीडित महिलेच्या घरासमोर येत जोरजोरात शिवीगाळ सुरू केली. यावेळी सुनीता यादव आणि तिची बहीण यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
वाद अधिकच वाढत गेला त्यानंतर आरोपींनी दोन महिलांना धक्काबुक्की करत मारहाण केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी घटनास्थळावरून निघून गेले.
मारहाणीमुळे जखमी झालेल्या महिलांनी तत्काळ नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दीपक कुरे, सागर कुरे, सुनीता यादव आणि तिच्या बहिणीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
