पहाटे असं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुप्रिया कानडे(वय37) आणि आरोपी अर्थात तिचा भाऊ अजित मालुष्टे(वय40) या दोघांत सुमारे सात कोटी रुपयांच्या मालमत्तेवरुन वारंवार होत असे. मात्र घटनेच्या दिवशी पहाटे या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढत गेला आणि पाहता पाहत संतापलेल्या अजितने बहिणीवर कोयत्याने वार केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्याने तिचा थेट शिरच्छेज केल्याचे समोर आलेले आहे.
advertisement
आईवरही केला हल्ला
धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या वेळी त्या घरात त्यांची आईही होती आणि ती जेव्हा मुलीला वाचवण्यासाठी आली तेव्हा आरोपीने तिच्यावरही हल्ला केला,ज्यात त्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरोपीचा खोटा दावा उघडकीस
घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली. सुरुवातीला आरोपीने आपण मानसिक आजाराने त्रस्त असल्याचा दावा केला, मात्र पोलिस तपासात तो खोटा असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी कोणतेही काम करत नव्हता आणि घराचा खर्च बहिणच चालवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली.
