मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळ्यात बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. टिटवाळा स्टेशन रोड परिसरात भरधाव कंटेनरने विरुद्ध दिशेनं येत रिक्षा, दुचाकी आणि चारचाकींना जोरदार धडक दिली.
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, भरधाव कंटेनर हा स्टेशन परिसरात शिरला आणि समोर येईल त्या वाहनांना धडक देत पुढे जात होता. विरुद्ध दिशेने येत या कंटेनरने १५ वाहनांचा चुराडा केला. या अपघातात एक रिक्षा चालक प्रवासी थोडक्यात बचावला आहे. रिक्षेतून हा प्रवासी बाहेर उतरणार होता, पण मागे वळून पाहिलं तर कंटेनर वेगात येत आहे. हे पाहताच या तरुणाने लगेच रिक्षामध्ये बसला. पुढच्या एक सेकंदात कंटेनर हा रिक्षाला घासून गेला. अवघ्या २ सेकंदाने या तरुणाचा जीव वाचला.
advertisement
जर हा तरुण रिक्षाच्या बाहेर उतरला असता तर कंटेनरच्या खाली सापडला असता. पण, देव बलवत्तर होतं म्हणून तरुणाचा जीव वाचला. हा भरधाव कंटेनर जवळपास अर्धा किलो मीटरपर्यंत सलग १० ते १५ वाहनांंना चिरड पुढे गेला. या अपघातात चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना मदत न करता चालक पळण्याच्या तयारीत होता पण संतप्त नागरिकांनी पाठलाग केला आणि चालकाला पकडून चोप दिला. कंटेनरचं ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहे.
