मुलाच्या आजारामुळे रुग्णालयात गेले, परत आल्यावर
कळवा येथील बुधाजीनगर परिसरात राहणाऱ्या सीमा मोरे आणि त्यांचे पती आयटी कन्सल्टन्सी व्यवसायासाठी अमेरिकेत काम करतात. 7 जानेवारी रोजी रात्री जेवण करून झोपण्याची तयारी चालू असताना त्यांचा मुलगा ओमकारला अचानक उलटीचा त्रास होऊ लागला. आई-वडील ताबडतोब त्याला जुपिटर रुग्णालयात नेण्यासाठी घाईगडबडीत निघाले.
घरी परतल्यावर बसला भयंकर धक्का
advertisement
घाईत निघताना सीमा मोरे यांनी हातातील डायमंडचे ब्रेसलेट आणि दोन अंगठ्या बेडरूममधील स्लाइडिंग खिडकीवर ठेवले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर परत आल्यावर या दागिन्यांचा शोध घेतला असता ते चोरीला गेले होते.
घडलेल्या घटनेची पोलिसांनी प्रकरणाची तक्रान घेऊन या प्रकरणी तपास सुरू केला आहे. स्थानिक परिसरात घरातील मोलकरीण संगीता जाधववर संशय व्यक्त केला जात असून तपासादरम्यान CCTV फुटेज आणि घरातील परिस्थितीची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
