TRENDING:

Earthquake: मुंबईजवळील शहरात भूकंपाचे धक्के जाणवले, दुपारच्यानंतर रात्रीही गावं हादरलं

Last Updated:

भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. रिश्टर स्केलवर 3.2  इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पालघर : मुंबईजवळील पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघर आणि जव्हार तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहे.  रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संपूर्ण पालघर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी नोंद झाली आहे. सुदैवाने अद्याप कुठेही जीवित वा वित्तीय हानी झाली नाही. मात्र, भूकंपाच्या धक्के जाणवल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  पालघरच्या पूर्व आणि उत्तर भागात पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरू झालं आहे.  पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. साडेनऊ वाजताच्या सुमारा पालघरच्या काही भागात भूकंपाचा हादरे जाणवले. भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. रिश्टर स्केलवर 3.2  इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली आहे.

जव्हार तालुक्यातील धामणी डेंगाची मेट खडखळ धरण क्षेत्रात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंप मापक यंत्रात 3.2 रिकट स्क्वेअरच्या धक्क्याची नोंद झाली आहे. शनिवारी  दुपारी आणि संध्याकाळी भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. त्यामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या धक्क्यांमुळे  कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचा अहवाल अजून पर्यंत प्राप्त  झाला नाही, असा खुलासा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून  करण्यात आला आहे. 3.2 रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली आहे, हा सौम्य भूकंप असल्याचं सांगितलं जात आहे.

advertisement

पालघरमध्ये का जाणवतात भूकंपाचे धक्के? 

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसरामध्ये नोव्हेंबर २०१८ पासून वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. शास्त्रज्ञांनी मागील अनेक वर्षांपासून या भागात अभ्यास करत आहे. पालघरमध्ये अर्थक्वेक स्वार्म (Earthquake Swarm) हा भूकंपाचा एक प्रकार आहे. याचा अर्थ असा की हे एका 'भूकंप समूहा'चा भाग आहेत. शक्यतो यात मोठा भूकंपाचा धक्का नसतो. पण अनेक लहान धक्के जाणवतात. हे एका कालावधीपर्यंत जाणवत असतात, याची प्रक्रिया ही काही महिने किंवा वर्षांपर्यंत सुद्धा असते. पालघर परिसरात पावसामध्ये झालेल्या बदलाचे हे परिणाम मानले जातात याला   हायड्रो-सिस्मिसिटी (Hydro-seismicity)  असं म्हटलं जातं.

advertisement

पावसाचं पाणी जेव्हा जमिनीतून खोलवर जाते त्यावेळी हे पाणी भूगर्भातील खडकांच्या थरांमध्ये साचतं आणि तिथे प्रचंड दाब निर्माण होतो.  जेव्हा हा पाण्याचा दाब वाढतो, तेव्हा खडकांच्या थरांमधील घर्षण कमी होतं आणि ते एकमेकांवरून घसरतात, ज्यामुळे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवतात. अनेकदा पावसाळ्यानंतर काही काळ हे धक्के जास्त प्रमाणात जाणवत असतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतात करा गार AC मध्ये काम, चक्क ट्रॅक्टरला बसवला एसी, किती आला खर्च? Video
सर्व पहा

पालघरचा भाग  कडक बेसाल्ट खडकांचा आहे. कोकण किनारपट्टीच्या समांतर काही भूगर्भीय भेगा आहेत. पृथ्वीच्या पोटातील टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे या जुन्या भेगा पुन्हा सक्रिय होऊ शकतात. पालघरमधील धक्के जमिनीपासून खूप कमी खोलीवर (साधारणपणे ५ ते १५ किमी) केंद्रबिंदू असल्याने त्यांची तीव्रता कमी असली तरी त्यांचा आवाज मोठा येतो आणि ते स्पष्ट जाणवत असतात.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Earthquake: मुंबईजवळील शहरात भूकंपाचे धक्के जाणवले, दुपारच्यानंतर रात्रीही गावं हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल