TRENDING:

बहिणीची छेड काढणाऱ्या तिघांवर भावाचा गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, मुंब्र्यातील सनसनाटी घटना!

Last Updated:

ठाण्यातील मुंब्रा परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बहिणीची छेड काढल्याचा रागातून मानलेल्या भावाने थेट गोळीबार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: ठाण्यातील मुंब्रा परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बहिणीची छेड काढल्याचा रागातून मानलेल्या भावाने थेट गोळीबार केला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे जखमी झाले आहेत.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्र्यातील सुमनताई चव्हाण हिंदी शाळेच्या परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. अकबर शेख असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर अब्दुल शेख आणि समीर शेख असं जखमी झालेल्या दोघांचं नाव आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून अकबर शेख, अब्दुल शेख आणि समीर शेख हे तिघे जण आरोपीच्या मानलेल्या बहिणीची वारंवार छेड काढत होते. आरोपींचा त्रास वाढत गेल्यानंतर तरुणी याबाबतची माहिती आपल्या मानलेल्या भावाला दिली. यानंतर आरोपी भावाने छेड काढणाऱ्यांचा बदला घेण्याचा कट रचला.

advertisement

यातूनच आरोपी भावाने अकबर शेख, अब्दुल शेख आणि समीर शेख तिघेही शाळेच्या परिसरात असताना यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात अकबर शेख याचा जागीच मृत्यू झाला. तर, अब्दुल शेख आणि समीर शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

गोळीबारानं परिसरात खळबळ

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
18 तीर्थांनी समृद्ध महाराष्ट्रातील गाव, देवांचा वाडा म्हणून आहे ओळख, जपलीये ऐतिहासिक परंपरा, Video
सर्व पहा

गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

मराठी बातम्या/ठाणे/
बहिणीची छेड काढणाऱ्या तिघांवर भावाचा गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, मुंब्र्यातील सनसनाटी घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल