भाजपाच्या माजी नगरसेविका दिपाली मोकाशी, माजी नगरसेविका वीणा भोईर आणि सूर्यकांत भोईर यांना तिकीट न मिळाल्यामुळे भाजपाला रामराम ठोकत कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपासाठी मोठी नामुष्की
प्रवेशानंतर नगरसेविकांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, शिवसेना ही कोणाच्या वैयक्तिक मालकीची नाही. कोणताही कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतो. मात्र भाजपामधील काही नेते, विशेषतः स्थानिक ‘अड्डा’ म्हणून ओळखले जाणारे नरेंद्र मेहता, हे पक्षाला स्वतःची संपत्ती समजतात आणि त्याच मानसिकतेतून निर्णय घेतले जातात. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतील लोकांना संधी दिली गेली, त्यामुळेच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी ही मोठी नामुष्की मानली जात आहे.
advertisement
अंबरनाथमध्ये भाजपला मोठा धक्का
अंबरनाथमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी थेट काँग्रेसशी युती केली . ही विचित्र युती देशभरात चर्चेचा विषय ठरली. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या 12 नगरसेवकांचं निलंबन केलं. या नगरसेवकांना भाजपनं आपल्या पक्षात घेतलं. सत्ता स्थापनेचा दावा केला. पण आता श्रीकांत शिंदेंनी मोठी राजकीय खेळी करत भाजपला धक्का दिला आहे. शिंदेसेनेने आता थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्य 4 नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापन केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी चव्हाण यांना धक्का दिला आहे.
हे ही वाचा :
