मिळालेल्या माहितीनुसार, अनिल साळवे हा कल्याण परिसरातील मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत होता. त्याच्याकडे काही मुलं आणि मुलीही प्रशिक्षण घेत आहेत. इथं येणाऱ्या मुलींशी त्याने गैरवर्तन केल्याची चर्चा गेल्या काही काळापासून होत होती. मात्र, नातेवाईकांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे.
advertisement
आरोपी साळवे हा शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील कृत्य करत असताना नातेवाईकाने पाहिले. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तत्काळ कल्याण तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार साळवे याच्याविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमोर दाखल केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी दिवाळीत देखील साळवेने दुसऱ्या एका मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिने आपल्या पालकांना सांगितलं होतं. आता दुसऱ्या मुलीच्या पालकांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी देखील साळवेविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
