काय सांगता! मुंबईत होणार दुसरा आयफेल टॉवर
ज्यात घोषणा केलेल्या प्रकल्पामुळे ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून ते प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओखळ मिळून देतील.ठाणे शहरातील कासारवडवली येथील खाडीकिनारी निरीक्षण मनोरा म्हणेज 'Viewing Tower'आणि भव्य कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार असून हा प्रकल्प ठाण्याच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
कासारवडवली खाडीकिनारी सुमारे 50 एकर जागेत 'मंगल कलश' या संकल्पनेवर आधारित 260 मीटर उंचीचा देशातील सर्वात उंच टॉवर उभारण्यात येणार आहे. आयफेल टॉवरच्या धर्तीवर साकारण्यात येणाऱ्या या टॉवरमध्ये अत्याधुनिक निरीक्षण मनोरा तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर असणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे आयफेल टॉवरची उंची 300 मीटर असून हा टॉवर देशातील अतिशय उंच इमारतींपैकी एक असणार आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण डिझाईन हफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले आहे.
advertisement
एवढेच नाही तर कोलशेत परिसरात 25 एकर जागेवर बीओटी तत्त्वावर टाऊन पार्क उभारले जाणार आहे. या टाऊन पार्कमध्ये आगरी-कोळी संस्कृती दर्शवणारे संग्रहालय, आधुनिक विज्ञान केंद्र, भव्य मत्स्यालय, क्रीडासंकुल, स्नो पार्क, अॅमेझॉन पार्क, अॅडव्हेंचर पार्क आणि पक्षी संग्रहालय यांचा समावेश असेल. विशेष गोष्ट म्हणजे येथे तळमजला आणि एक मजला अशा स्वरूपातील एलिव्हेटेड गार्डन विकसित करण्यात येणार असून नागरिकांना पर्यटनाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
